जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर, रोहित शर्मा समोर नवा पेच, गोलंदाजीची धुरा कुणाकडे दे
नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीतून दुखापतीमुळं बाहेर पडला आहे. यामुळं भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. बीसीसीआयनं काल रात्री उशिरा याबाबत घोषणा केली. जसप्रीत बुमराहच्या जागी हर्षित राणा आणि यशस्वी जयस्वालच्या जागी वरुण चक्रवर्तीला संघात स्थान देण्यात आलं आहे. भारताच्या टी 20 वर्ल्ड कप विजयात महत्त्वाची कामगिरी करणारा जसप्रीत बुमराह संघाबाहेर गेल्यानं कॅप्टन रोहित शर्माला मोठा धक्का बसला आहे. कॅप्टन रोहित शर्माला आता वेगवान गोलंदाजीसाठी कुणावर विश्वास दाखवायचा हा प्रश्न सोडवावा लागणार आहे.
जसप्रीत बुमराह संघाबाहेर, रोहित शर्मासमोर नवा प्रश्न
जसप्रीत बुमराहनं टी 20 वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी केली होती. जसप्रीत बुमराह मालिकावीर ठरला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत देखील जसप्रीत बुमराहनं चांगली कामगिरी केली होती. रोहित शर्माच्या टीममधील प्रमुख वेगवान गोलंदाज असलेला जसप्रीत बुमराह आता चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघात नसणार आहे. रोहित शर्माला ता मोहम्मद शमी, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह यांच्यापैकी दोन वेगवान गोलंदाजांवर विश्वास दाखवावा लागेल.
रोहित कुणावर विश्वास दाखवणार
मोहम्मद शमीनं वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीचं नेतृत्त्व केलं होतं. शमी त्या वर्ल्ड कपनंतर दुखापतग्रस्त झाला होता. आता मोहम्मद शमीनं कमबॅक केलं असून त्यानं टी 20 सामने आणि वनडेचे काही सामने खेळले आहेत. अद्याप तो पूर्णपणे लयीत परतलेला नाही. दुसरीकडे हर्षित राणा आयसीसीच्या मोठ्या स्पर्धेत पहिल्यांदा सहभागी होतोय. अर्शदीप सिंग फॉर्ममध्ये असला तरी त्याला इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही. त्यामुळं 19 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहित शर्माला या तीन पैकी दोन वेगवान गोलंदाजांवर विश्वास दाखवावा लागेल. मोहम्मद शमी अन् अर्शदीप सिंग अनुभवी असल्यानं ते कशी कामगिरी करतात हे पाहावं लागेल.
टीम इंडियामध्ये कोण खेळणार?
रोहित शर्मा (कर्नाधर), शुबमन गिल (उपमत), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), रशाभ पंत (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदरर, कुल्दीप यादव, हरहित राणा, मोहमध , वरुण चक्रवर्ती,
राखीव खेळाडू : यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज, शिवम दुबे
https://www.youtube.com/watch?v=suj_cz7ypdo
इतर बातम्या :
पॅट कमिन्स पाठोपाठ मिशेल स्टार्क चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर, ऑस्ट्रेलियावर कॅप्टन बदलण्याची वेळ
अधिक पाहा..
Comments are closed.