नशिबाने साथ दिली, पण फॉर्मने पाठ फिरवली! रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेत सगळं गमावल
रोहित शर्मा न्यूझीलंड विरुद्ध तिसरा सामना अयशस्वी : मैदान सज्ज होतं, चाहत्यांचा जल्लोष शिगेला पोहोचला होता आणि इंदूरच्या सपाट खेळपट्टीवर हिटमॅन रोहित शर्माकडून एका वादळी खेळीची अपेक्षा होती. पण म्हणतात ना, नशिबाने साथ दिली तरी कर्माने द्यावी लागते, असंच काहीसं रोहितच्या बाबतीत घडलं. न्यूझीलंडविरुद्धच्या सलग तिसऱ्या सामन्यात रोहित शर्मा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला आणि एका मोठ्या संधीचं सोनं करण्याऐवजी त्याने ती मातीमोल केली.
नशिबाने साथ दिली, पण फॉर्मने पाठ फिरवली!
न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माची खराब फॉर्मची मालिका तिसऱ्या सामन्यातही सुरूच राहिली. फलंदाजीसाठी पोषक खेळपट्टी असतानाही रोहितला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले, ज्यामुळे भारतीय संघाला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला. मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा 26 धावांवर बाद झाला होता. दुसऱ्या सामन्यातही त्याला अपेक्षित फटकेबाजी करता आली नाही. 38 चेंडूचा सामना करताना त्याने केवळ 4 चौकारांच्या मदतीने 24 धावा केल्या. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात रोहितला नशीबाची साथ मिळाली होती. मात्र, रोहित शर्मा पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.
दोन चांगल्या मालिकेनंतर रोहित शर्मासाठी शांत मालिका #INDvNZ pic.twitter.com/xRvO0kn49h
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) 18 जानेवारी 2026
जीवनदान मिळूनही संधी गमावली
तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. डावाच्या चौथ्या षटकात रोहितला नशिबाची साथही मिळाली. चौथ्या षटकातील चौथ्या चेंडूवर न्यूझीलंडचा विकेटकीपर मिचेल हे याने रोहितचा सोपा झेल सोडला. या जीवनदानानंतर पुढच्याच चेंडूवर रोहितने शानदार चौकार लगावत पुनरागमन करण्याचे संकेत दिले होते. मात्र, हे समाधान फार काळ टिकले नाही. त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा झेलबाद झाला. त्याने 13 चेंडूत केवळ 11 धावा केल्या. रोहित बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या केवळ 28 होती.
मालिकेतील निराशाजनक कामगिरी
- पहिला सामना : केवळ 26 धावा.
- दुसरा सामना : 38 चेंडूत 24 धावा.
- तिसरा सामना : 13 चेंडूत 11 धावा.
एकूण तीन सामन्यात 61 धावा केल्या.
नेमकं काय गमावलं?
या मालिकेत रोहितने धावांच्या बाबतीत काहीही खास कमावलेलं नाही. उलट, सलग तीन संधी गमावल्यामुळे त्याने आपला फॉर्म आणि आत्मविश्वास गमावला आहे, असंच चित्र सध्या दिसत आहे. तिसऱ्या सामन्यात भारताची पहिली विकेट 28 धावांवर पडली, ज्यामुळे पुन्हा एकदा मधल्या फळीवर दडपण आलं.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.