इंग्लंडमध्ये रोहित शर्माचा दबदबा! 'हे' आकडे पाहून इंग्लिश गोलंदाजांची उडाली झोप
भारत विरुद्ध इंग्लंड IND VS ENG यांच्यातील एकदिवसीय (ODI) मालिकेसाठी पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा रोहित शर्मा ROHIT SHARMA आणि विराट कोहली VIRAT KOHLI यांच्यावर खिळल्या आहेत. या मालिकेतील पहिला सामना 14 जुलै रोजी बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे खेळवला जाणार आहे. भारतीय संघात शुबमन गिल, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांसारखे अनुभवी खेळाडू असले, तरी इंग्लंडच्या भूमीवरील त्याची उत्कृष्ट कामगिरी पाहता इंग्लंडचे गोलंदाज रोहित शर्मालाच सर्वाधिक घाबरतील.
इंग्लंडच्या मैदानांवर रोहित शर्माची फलंदाजी नेहमीच बहरली आहे. Rohit Sharma Stats भारताव्यतिरिक्त, इंग्लंड हे असे ठिकाण आहे जिथे त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक यश मिळवले आहे. आपल्या संपूर्ण एकदिवसीय कारकिर्दीत रोहितने सरासरी जवळपास 49 च्या वेगाने 11720 धावा केल्या आहेत; मात्र, इंग्लंडमधील त्याची सरासरी त्याहूनही अधिक प्रभावी आहे.
इंग्लंडमध्ये खेळलेल्या 27 एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहितने सरासरी 65 च्या वेगाने 1428 धावा केल्या आहेत. यामध्ये 7 शतके आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे. ही आकडेवारी पाहता, रोहितला रोखणे हे इंग्लंडच्या गोलंदाजांसाठी एक मोठे आव्हान ठरेल. Rohit Sharma Stats in England
पण, या वर्षी एकदिवसीय सामन्यांमध्ये रोहित शर्माची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. 2026 मध्ये आतापर्यंत त्याने 6 एकदिवसीय सामने खेळले असून, 6 डावांमध्ये सरासरी 34च्या वेगाने 204 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने केवळ एक अर्धशतक झळकावले आहे, जे अफगाणिस्तानविरुद्धच्या मागील एकदिवसीय मालिकेत आले होते. त्याने या धावा 100 च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत.
रोहित शर्माने कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून आता तो केवळ एकदिवसीय सामने आणि आयपीएल (IPL) खेळतो. 2024 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने टी-20 क्रिकेटला निरोप दिला. त्यानंतर कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली. सध्या रोहितचे संपूर्ण लक्ष 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकावर आहे. या स्पर्धेत खेळण्यासाठी त्याला आपली तंदुरुस्ती आणि फॉर्म टिकवून ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे, इंग्लंडविरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा फलंदाजीमध्ये कशी कामगिरी करतो, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Comments are closed.