रोहित शर्माच्या निशाण्यावर जावेद मियांदादचा रेकॉर्ड! सीएसके हेड कोचला मागे टाकत रोहित करणार खास क्लबमध्ये प्रवेश

रोहित शर्माने (Rohit Sharma) तब्बल सात वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुनरागमन केले आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात ‘हिटमॅन’ला पाहण्यासाठी चाहत्यांनी स्टेडियमवर मोठी गर्दी केली होती आणि रोहितनेही चाहत्यांना निराश न करता ख्रिसमसची मोठी भेट दिली.

रोहितने सिक्कीमविरुद्ध खेळताना अवघ्या 62 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. हे त्याच्या लिस्ट-ए करिअरमधील सर्वात वेगवान शतक ठरले. यापूर्वी 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये त्याने अफगाणिस्तानविरुद्ध 63 चेंडूंत शतक झळकावले होते. रोहितने 94 चेंडूंमध्ये 155 धावांची तुफानी खेळी केली. यामध्ये 18 चौकार आणि 9 उत्तुंग षटकारांचा समावेश होता.

त्याने अंगकृष रघुवंशीसोबत 141 धावांची आणि पदार्पण करणाऱ्या मुशीर खानसोबत 75 धावांची भागीदारी केली. या खेळीच्या जोरावर मुंबईने सिक्कीमचा सहज पराभव करत स्पर्धेत विजयी सुरुवात केली.

रोहित आता शुक्रवारी पुन्हा मैदानात उतरणार असून, या सामन्यात तो अनेक महान क्रिकेटपटूंना मागे टाकू शकतो. रोहितने आतापर्यंत 351 लिस्ट-ए सामन्यांत 13,913 धावा केल्या आहेत. जर शुक्रवारी त्याने आणखी 107 धावा केल्या, तर तो पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियांदाद (13,793 धावा) आणि सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (14,019 धावा) यांना मागे टाकेल. जर रोहितने पुढच्या सामन्यात 87 धावा केल्या, तर लिस्ट-ए क्रिकेटमध्ये 14,000 धावा पूर्ण करणारा तो जगातील 26 वा फलंदाज ठरेल.

रोहितची लिस्ट-ए कामगिरी:
समोर: 351
धावा: 13,913
शतके: 37
सरासरी: 47.32

Comments are closed.