छत्रपती शिवाजी पार्कमध्ये सरावात रोहित शर्माने स्वतःचीच गाडी फोडली? व्हिडीओ व्हायरल
भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी जबरदस्त सराव करत आहे. शुक्रवारी त्याने मुंबईतील प्रसिद्ध शिवाजी पार्क मैदानावर जवळपास दोन तास फलंदाजीचा सराव केला. या सराव सत्रात त्याला माजी क्रिकेटपटू अभिषेक नायरने मार्गदर्शन केलं.
रोहितने सरावादरम्यान पुल शॉट्स, कट शॉट्ससह फिरकी गोलंदाजांवर स्वीप आणि स्लॉग स्वीप शॉट्सवरही विशेष लक्ष केंद्रित केलं. सोशल मीडियावर या सराव सत्राचे काही व्हिडीओ व्हायरल होत असून, एका व्हिडीओमधील एका क्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हिडीओमध्ये रोहितने लेग साइडवर एक भल्या मोठा फटका मारला. त्यानंतर प्रेक्षकांमध्ये एक जल्लोष उसळतो, आणि त्याचवेळी काही लोक असा दावा करतात की ती चेंडू सरळ रोहितच्या स्वतःच्या ‘लेम्बोर्गिनी उरुस’ गाडीवर जाऊन आदळली. एका चाहत्याचा व्हिडीओमध्ये म्हणणं आहे, “आपलीच गाडी फोडली रोहितने!”
रोहित शर्माने त्या सहा जणांना ठोकले, ते सरळ गेले आणि त्याच्या स्वत: च्या लॅम्बोर्गिनीवर उतरले. pic.twitter.com/lbinvMedyc
– 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiiii_12) 10 ऑक्टोबर, 2025
यासंदर्भात कोणतीही अधिकृत पुष्टी अद्याप झाली नसली, तरी या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. माहितीप्रमाणे, लेम्बोर्गिनी उरुस या आलिशान SUV कारची किंमत 4.57 कोटी रुपयांपासून सुरू होते आणि ती 5.40 कोटी रुपयांपर्यंत जाते.
रोहित शर्मा तब्बल सात महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करतो आहे. तो शेवटचा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताकडून खेळला होता. 19 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत तो पुन्हा मैदानावर उतरणार आहे. मात्र, यावेळी कर्णधारपदाची धुरा शुबमन गिलकडे सोपवण्यात आली असून, मुख्य निवडकर्ते अजित अगरकर यांनी अलीकडेच ही घोषणा केली.
CEAT क्रिकेट अवॉर्ड्समध्ये आपल्या पुनरागमनावर बोलताना रोहित म्हणाला होता की, “ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायला नेहमीच मजा येते.” ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 46 वनडे सामन्यांमध्ये त्याने 57.31 च्या सरासरीने 2407 धावा केल्या आहेत, ज्यात 8 शतके आणि 9 अर्धशतके समाविष्ट आहेत.
Comments are closed.