खुशखबर.!! रोहित शर्मा फक्त विजय हजारेतच नाही, तर SMAT नॉकआउट सामन्यांतही मुंबईकडून खेळणार!
कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्त झालेला टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आता एकदिवसीय सामन्यांव्यतिरिक्त देशांतर्गत स्पर्धांवरही लक्ष केंद्रित करत आहे. त्याने आधीच विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकदिवसीय स्वरूपात खेळण्यास सहमती दर्शविली आहे आणि आता तो टी-20 स्वरूपात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्येही खेळताना दिसेल. मीडिया रिपोर्टनुसार, हिटमॅनने मुश्ताक अली ट्रॉफीच्या नॉकआउट सामन्यांमध्ये खेळण्याची इच्छा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे व्यक्त केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, “रोहितने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या नॉकआउट सामन्यांमध्ये मुंबईकडून खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.” टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधून निवृत्ती घेतल्यानंतरही रोहित शर्माने हा निर्णय घेतला आहे.
मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये, मुंबईने लखनऊमध्ये त्यांचे चारही लीग स्टेज सामने जिंकले. संघ 16 गुणांसह एलिट ग्रुप ए मध्ये अव्वल स्थानावर आहे. संघ आधीच नॉकआउट टप्प्यात प्रवेश केला आहे.
रोहित शर्मा सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळत आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना शनिवारी खेळवला जाईल. यामुळे रोहित शर्मा 12 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या मुंबईच्या नॉकआउट सामन्यांसाठी उपलब्ध होईल. मुंबईचे नॉकआउट सामने 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान इंदूरमध्ये खेळले जातील.
रोहित शर्मा शेवटचा 2011-12 हंगामात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळला होता. याचा अर्थ तो सुमारे 14-15 वर्षांनी या स्पर्धेत खेळणार आहे.
माजी कर्णधार विराट कोहलीनेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळेल. त्याने त्याच्या उपलब्धतेबद्दल डीडीसीएला माहिती दिली आहे.
Comments are closed.