विराट, शुभमनला धक्का! रोहित शर्मा अव्वल, श्रेयस अय्यरलाही फायदा; आयसीसी क्रमवारी जाहीर, पाहा सं
रोहित शर्मा आयसीसी वनडे क्रमवारीत अव्वल: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर, भारतीय सलामीवीर रोहित शर्मा याने बुधवारी (29 ऑक्टोबर 2025) आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या नव्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. 38 वर्षीय रोहित शर्मा हा आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणाऱ्या सर्वात वयस्कर फलंदाजांपैकी एक ठरला आहे. आपल्या दीर्घ क्रिकेट कारकिर्दीत रोहितने पहिल्यांदाच ही कामगिरी साध्य केली आहे.
रोहितने आपल्या रेटिंगमध्ये तब्बल 36 गुणांची भर घालत 741 वरून 781 गुणांपर्यंत मजल मारली. यामुळे त्याने भारतीय संघसहकारी आणि सध्याचा कसोटी व वनडे कर्णधार शुभमन गिल याला मागे टाकत पहिला क्रमांक मिळवला. यापूर्वी 2019 च्या विश्वचषकादरम्यान रोहित 882 रेटिंग गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला होता. त्या वेळी त्याने विक्रमी पाच शतके झळकावली होती.
सात महिन्यांच्या विश्रांतीनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करताच रोहितने पुन्हा एकदा आपल्या बॅटने वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने तीन डावांत 202 धावा केल्या, ज्यात एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. त्याचा फलंदाजीचा सरासरी तब्बल 101 इतका होता. या दमदार कामगिरीच्या जोरावर रोहित शर्मा आयसीसीच्या वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला. सिडनीत झालेल्या तिसऱ्या वनडेत त्याने आपल्या कारकिर्दीतील 33वे एकदिवसीय आणि 50वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. त्याच्या त्या शतकाच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा 9 विकेट्सनी पराभव केला.
शुभमन गिल अन् विराट कोहलीची घसरण
अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रान दुसऱ्या स्थानी असून भारतीय कर्णधार शुभमन गिल पहिल्या स्थानावरून घसरून आता तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. दरम्यान, स्टार फलंदाज विराट कोहलीदेखील एका स्थानाने खाली येत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
श्रेयस अय्यरलाही फायदा
दुसरीकडे, अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरने एक स्थानाची झेप घेतली असून तो आता नवव्या स्थानावर आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनीतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरला गंभीर दुखापत झाली आहे. झेल घेताना झालेल्या अपघातात अय्यरच्या बरगड्यांना मार लागला, ज्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव (Internal bleeding) सुरू झाला. तत्काळ त्याला रुग्णालयात नेण्यात आले असून, ICU मध्ये दाखल करण्यात आले. बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले असून, सध्या अय्यरची तब्येत स्थिर आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.