वनडेमध्ये 'या' 3 भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध दाखवला दम! आकडेवारी शानदार
यंदाची आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफी (ICC Champions Trophy 2025) अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान या मेगा स्पर्धेतच्या पहिल्या सेमीफायनलसाठी जागतिक क्रिकेटमधील 2 सर्वात मोठे बलाढ्य संघ भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) पुन्हा एकदा एकमेकांशी भिडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
चॅम्पियन्स ट्राॅफीच्या पहिल्या सेमीफायनल सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) आमने-सामने आहेत. दरम्यान दोन्ही संघातील हा अटीतटीचा सामना (4 मार्च) रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणार आहे.
आयसीसी या सर्वात मोठ्या सामन्यासाठी भारतीय संघ पूर्णपणे सज्ज आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील, भारतीय संघाने आतापर्यंत या स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली आहे. भारतीय संघ आपल्या गटातील तिन्ही सामने जिंकून येथे पोहोचला आहे. तत्पूर्वी या बातमीद्वारे आपण त्या 3 फलंदाजांबद्दल जाणून घेऊया, ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.
1) सचिन तेंडुलकर 3,077 धावा- क्रिकेटविश्वात देवाचा दर्जा मिळविणारा माजी महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचे (Sachin Tendulkar) स्थान खूप मोठे आहे. तेंडुलकरच्या नावावर विक्रमांची एक मोठी यादी आहे. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धही त्याच्या बॅटने दम दाखवला आहे. सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामन्यात सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 71 सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 70 डावांमध्ये 44.59च्या शानदार सरासरीने 3,077 धावा केल्या. दरम्याने त्याने 15 अर्धशतकांसह 9 शतके झळकावली.
2) रोहित शर्मा- 2,379 धावा- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि दिग्गज फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) हा वनडे क्रिकेटमध्ये खूप धोकादायक फलंदाज आहे. रोहितने आपल्या फलंदाजीने या फॉरमॅटमध्ये प्रत्येक विरोधी संघाला त्रास दिला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची बॅट वेगळ्या लयीत बोलली आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध 45 वनडे सामन्यांच्या 45 डावांमध्ये सुमारे 58च्या सरासरीने 2,379 धावा केल्या. रोहितने 9 अर्धशतकांसह 8 शतके झळकावली.
3) विराट कोहली- 2,367 धावा- भारताचा रन मशीन विराट कोहली (Virat Kohli) हा जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. या धडाकेबाज फलंदाजाने वनडे सामन्यात अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. ज्यामध्ये तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध भरपूर धावा काढण्यात यशस्वी झाला. किंग कोहलीचा कांगारूंविरूद्ध रेकॉर्ड उत्तम आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 49 वनडे सामन्यात 53.79च्या सरासरीने 2,367 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 14 अर्धशतकांसह 8 शतके झळकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
हर्षित की वरूण? ऑस्ट्रेलिया विरुद्ध प्लेइंग इलेव्हन मध्ये कोणाचा होणार प्रवेश? जाणून घ्या एका क्लिकवर
रोहित शर्माने गाठला नवा शिखर; विराट-धोनीसह कपिल देवलाही टाकलं मागे!
IND vs AUS: उद्या रंगणार सेमीफायनलचा थरार! कधी आणि कुठे पाहायचा लाईव्ह सामना?
Comments are closed.