क्रिकेटर नाही डॉक्टर रोहित शर्मा! हिटमॅनबाबत मोठी घोषणा

भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा भारतीय क्रिकेटमध्ये उल्लेखीय कामगिरी करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा टी२० विश्वचषक (२०२४) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी (२०२५) जिंकण्याची कामगिरी केली. त्याच्या या योगदानामुळे त्याचा मोठा सन्मान केला जाणार आहे. बुधवारी (२२ जानेवारी) डी.वाय. पाटील विद्यापीठाने त्याच्याबाबत महत्वाची घोषणा केली.

क्रिकेटमधील अतुलनीय योगदान आणि नेतृत्वासाठी रोहितला डी.वाय. पाटील विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले जाणार आहे. यामुळे शनिवारी (२४ जानेवारी) होणाऱ्या पदवीदान समारंभात तो आकर्षणाचा मुद्दा असणार आहे.

याबाबत विद्यापीठाने म्हटले, “चाहते त्याला हिटमॅन म्हणून ओळखतात. पदवीदान समारंभात त्याला त्याच्या क्रिकेटमधील योगदानाबाबत डॉक्टरेट पदवी दिली जाणार आहे.”

रोहितने आंतरराष्ट्रीय कसोटी आणि टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या तो भारताकडून केवळ वनडे सामने खेळतो. त्याचबरोबर कारकिर्दीत पहिल्यांदाच तो टी२० विश्वचषक खेळणार नाही. याबाबत भावूक होताना त्याने वक्तव्य केले. तो म्हणाला, “कारकिर्दीत पहिल्यांदा टी२० विश्वचषक बाहेर बसून पाहणार असल्याचे विचित्र वाटत आहे.”

रोहित भारताचा एमएस धोनीनंतर सर्वाधिक यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. नुकतेच तो घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळताना दिसला. यामध्ये तो खास कामगिरी करू शकला नाही

रोहितने भारतासाठी ६७ कसोटी सामन्यांत खेळताना ४३०१ धावा केल्या आहेत. त्यामध्ये १२ शतके आणि १८ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने १५९ टी२० सामन्यांमध्ये ५ शतक आणि ६१ अर्धशतकांच्या साहाय्याने ४२३१ धावा केल्या आहेत.

सध्या रोहित भारताकडून केवळ वनडे प्रकार खेळत आहे. यामध्ये त्याने आतापर्यंत २८२ सामने खेळले असून त्यात ३३ शतक आणि ६१ अर्धशतकांच्या मदतीने ११५७७ धावा केल्या आहेत. तसेच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाजही आहे. त्याने ६५० षटकार मारले आहेत.

Comments are closed.