मुुंबईकर रोहित शर्माचं अखेर ठरलं! ढाण्या वाघ रणजी करंडक स्पर्धेत खेळणार; टीमचं नेतृत्त्व मात्र
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून देशांतर्गत खेळवल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफीची सगळीकडे चर्चा आहे. टीम इंडियासाठी खेळणारे अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेत मोठ्या हिरिरीने खेळतात. तर काही खेळाडू या ट्रॉफीत खेळण्यास टाळाटाळ करण्याचाही आरोप केला जातो. त्यामुळेच रोहित शर्मा यावेळी रणजी ट्रॉफीत खेळणार का? असे विचारले जात होते. असे असतानाच आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
रोहित शर्मा असणार मुंबई संघाचा भाग
मिळालेल्या माहितीनुसार रोहित शर्मा यावेळी रणजी ट्रॉफीत खेळणार आहे. तो मुंबई संघाचा भाग असेल. विशेष म्हणजे संपूर्ण टीम इंडियाचे नेतृत्त्व करणारा रोहित शर्मा या स्पर्धेत मात्र एक सामान्य खेळाडू म्हणून मैदानात उतरेल. कारण मुंबई संघाचे कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे असेल.
मुंबईचा जम्मू काश्मीरसोबत सामना
मिळालेल्या ताज्या माहितीनुसार रोहित शर्मा रणजी करंडकात खेळणार आहे. तो मुंबईच्या संघाचा भाग असेल. येत्या 23 जानेवारी रोजी मुंबई संघाचा जम्मू काश्मीरविरुद्ध सामना होणार आहे. रोहित शर्मा याआधी 2015 साली रणजी करंडकात खेळला होता. त्यानंतर तो आता म्हणजेच तब्बल 10 वर्षांनी या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे.
मुंबईच्या संघात कोण कोण असेल?
मुंबईचा संघात यावेळी एकूण 17 खेळाडू असतील. यामध्ये अजिंक्य रहाणे याच्याकडे कर्णधारपद असेल. तर रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, शीवम दुबे, शार्दुल ठाकूर आदी बडे खेळाडून या संघाचा भाग असतील. याशिवाय आयुष म्हात्रे, सिद्धेश लाड, हार्दिक टामोरे (यष्टीरक्षक), आकाश आनंद (यष्टीरक्षक), तानुष कोटियान, शॅम्स मुलानी, हिमांशु सिंह, मोहित अवस्थी, सेलव्हेस्टर डिसुझा, रॉयस्टॉन डियास, कार्ष कोठारी हे खेळाहूडी मुंबई संघाचा भाग असतील.
23 जानेवारीपासून स्पर्धेला सुरुवात
दरम्यान, येत्या 23 जानेवारीपासून रणजी ट्रॉफी चालू होणार आहे. त्यासाठी राज्यातील वेगवेगळ्या संघांनी आपला सरावही चालू केला आहे. मुंबईकडून खेळणारा यशस्वी जैस्वाल 15 जानेवारीपासूनच शिबिरात सामील झाला आहे.
हेही वाचा :
अधिक पाहा..
Comments are closed.