चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली तरी उपयोग नाही? रोहितच्या कर्णधारपदावर टांगती तलवार!

भारतीय संघाने 13 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून विजय मिळवला. यानंतर रोहित शर्माच्या कर्णधार पदाचे कौतुक तर झाले तसेच त्याचे कर्णधार पद सुरक्षित राहील का याच्या चर्चा सुद्धा सुरू झाल्या आहेत. आयपीएल 2025 च्या चार आठवड्यानंतर भारतीय संघाला इंग्लंडच्या दौऱ्यावर जायचे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ज्याप्रकारे रोहित शर्माने भारतीय संघाचे नेतृत्व केले त्याचप्रमाणे 20 जून पासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत सुद्धा रोहित शर्मा भारताचे नेतृत्व करू शकतो. पण असं होऊ शकतं का? हा मोठा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण रोहितला कर्णधार बनवून ठेवण्यावर निवडकर्त्यांनी अजून कोणतीही घोषणा केली नाही.

एनबीटी मध्ये छापलेल्या एका रिपोर्टनुसार टीम इंडियाचा कर्णधार फक्त रोहित शर्मा असावा असे सगळ्यांना वाटते. पण यावर निवडकर्त्यांनी एकमत भूषवले नाही. रोहितचा व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये वैयक्तिक रेकॉर्ड खूप चांगलं आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये सलग 3 आयसीसी फायनल खेळले आहेत. पण कदाचित कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माचे कर्णधार पद धोक्यात पडताना दिसत आहे.

मागच्या वर्षी ऑक्टोबर मध्ये न्युझीलँड असा पहिला देश होता ज्याने, क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघाला त्यांच्याच घरच्या मैदानात येऊन कसोटी मालिकेत पराभूत केले होते. त्यानंतर रोहित शर्माकडे संधी होती की, ते भारताला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकवून स्वतःला एक चांगला कर्णधार सिद्ध करेल. पण तिथे टीम इंडियाला 1- 3 ने पराभव पत्करावा लागला. त्यामुळे भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या रेस मधून बाहेर पडला होता.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 मध्ये भारताला 9 सामन्यांमध्ये 8 पराभव पत्करावे लागले. रोहित शर्माने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मधील शेवटच्या सामन्यात स्वतःला सामन्याच्या बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्याचं म्हणणं होतं की, जर खूप खेळाडू खराब फॉर्ममध्ये खेळत असतील तर हा निर्णय संघासाठी योग्य नाही.

Comments are closed.