DC vs MI: रोहितचे अर्धशतक हुकलं, पण एम.एस. धोनीचा मोठा विक्रम मोडला! आता विराट कोहलीशी थेट टक्कर

मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) शनिवारी इंडियन प्रीमियम लीगमध्ये नवी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर, मेगा टूर्नामेंटमध्ये एका विशिष्ट प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या बाबतीत धोनीला मागे टाकले. रोहितने आपल्या 35 धावांच्या खेळीत केवळ एकच षटकार मारला, परंतु याच षटकारामुळे रोहित एका प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत एम.एस. धोनीच्या (Rohit Sharma Break Mahendra Singh Dhoni’s record) पुढे गेला. धोनी आरसीबीविरुद्ध 50 षटकारांसह या विशेष क्लबमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. साहजिकच, आता तिसऱ्या स्थानावर रोहितने ताबा मिळवला आहे.

मेगा टूर्नामेंटमध्ये एका प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहितने धोनीला तर मागे टाकले आहे, आणि आता त्याची नजर ‘बॉस’ ख्रिस गेलवर आहे. या बाबतीत गेलने पहिल्या दोन क्रमांकावर कब्जा केला आहे. पंजाबविरुद्ध 61 षटकारांसह गेल पहिल्या क्रमांकावर आहे, तर केकेआरविरुद्ध मिस्टर युनिव्हर्सने 54 षटकार मारले आहेत. साहजिकच, रोहित इथून एकदाचा दुसऱ्या क्रमांकावर कब्जा करू शकतो, परंतु पहिल्या पायरीवर पोहोचणे माजी कर्णधारासाठी सोपे नसेल. आता जेव्हा रोहित पुढच्या वेळी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळेल, तेव्हा त्याला गेलचे दुसरे स्थान मिळवण्यासाठी आणखी 4 षटकार ठोकवावे लागतील.

तसे पाहिले तर रोहित धोनीच्या पुढे गेला आहे, परंतु आणखी एका स्थानासाठी त्याची शर्यत विराट कोहलीसोबतही (Virat Kohli) लागली आहे. ज्याप्रमाणे एका प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत पहिले दोन क्रमांक गेलच्या नावावर आहेत, तसेच पाचव्या क्रमांकावर विराट कोहली (48 षटकार, विरुद्ध चेन्नई) आहे, तर सहाव्या क्रमांकावर पुन्हा रोहित (47 षटकार, विरुद्ध केकेआर) आहे. अशा परिस्थितीत ही शर्यत खूपच रंजक झाली आहे. आता पाचव्या क्रमांकावर अखेर कोण जाऊन थांबते, हे पाहण्यासारखे असेल.

Comments are closed.