रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणाला नवं वळण; बिश्नोई गँगशी संबंधित आरोपीच सूत्रधार
रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार: निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेरील गोळीबार प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळाले आहे. रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या या हल्ल्यामागे तुरुंगात असलेल्या बिश्नोई गँगशी (Lawrence Bishnoi Gang) संबंधित आरोपीचा हात असल्याचे मुंबई गुन्हे (Mumbai News) शाखेच्या तपासात उघड झाले आहे. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, तुरुंगात असलेल्या बिश्नोई गँगच्या सदस्य प्रवीण लोणकर यानेच या हल्ल्याचे सूत्रधार म्हणून काम केलेहे. त्याने कारागृहातूनच शस्त्रांची व्यवस्था आणि पैशांची उभारणी केल्याचा संशय आहे. या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य शूटरचाही त्यात समावेश आहे.
दरम्यानपोलीस आता अटक आरोपींची कोठडी मागून कारागृहातून हा कट नेमका कसा रचला गेला, त्यासाठी कोणत्या माध्यमांचा वापर करण्यात आला आणि आर्थिक व्यवहार कसे झाले, याचा सखोल तपास करणार आहेत. या घटनेनंतर चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली असून, धमकी दिलेल्या कलाकारांच्या सुरक्षा व्यवस्थेतबी वाढ केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mumbai Crime News : मुख्य शूटरसह आतापर्यंत 12 जणांना अटक
या गोळीबार प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने 12हून अधिक पथके तैनात केली आहेत. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासले असून एका व्हिडिओमध्ये हल्लेखोर पाच राऊंड गोळीबार करतानाही आता दिसले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली असून, मुख्य शूटरचाही त्यात समावेश आहे. या घटनेत कोणालाही जीवित हानी झालेली नसली तरी संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. तपासा दरम्यान पुण्यातील पाच संशयतांना ही ताब्यात घेण्यात आले. त्यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे. पाचव्या संशयताची कसून चौकशी केली जात आहे.
Rohit Shetty House Firing Case : नेमकं काय समोर आलं?
1 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील जुहू परिसरातील घराबाहेर गोळीबाराचा प्रकार घडला. फायरिंगपूर्वीच या गँगच्या सदस्यांनी शेट्टींच्या घरासह जुहू परिसराची सविस्तर रेकी केली होती. रेकी त्याच स्कूटरवरून केली गेली होती, ज्याचा वापर नंतर फायरिंगसाठी केला गेला. जेणेकरून हल्ल्यानंतर सहज पळून जाऊ शकले. या योजनेनुसार, शेट्टींच्या घराबाहेर पाच राउंड फायर केल्यानंतर, अनोळखी शूटर स्कूटरवर बसून पळून गेला. नंतर तो विले पार्ले रेल्वे स्टेशनवर पोहोचला, तिथे स्कूटर सोडला आणि ट्रेनने मुंबईतून पळून गेला.
आणखी वाचा
Comments are closed.