रोहित- विराटसारखे दर्जेदार फलंदाज कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणं, क्रिकेट विश्वासाठी मोठा धक्का!
भारतीय क्रिकेटचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यांच्या याच निर्णयाने चाहत्यांना अतिशय मोठा धक्का बसलेला आहे. दोन्ही खेळाडूंच्या निवृत्तीनंतर प्रशिक्षक दिनेश लाड यांनी भावुक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी दोन्ही खेळाडूंच्या खेळामध्ये उपलब्ध असलेल्या आठवणी आणि भारतीय क्रिकेटसाठी हा अतिशय दुखद क्षण आहे हेही सांगितले.
प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहित शर्माच्या निवृत्तीवर अतिशय खोल शब्दात निराशा व्यक्त करत म्हटले की रोहित सारख्या दिग्गज फलंदाजाने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेणे अतिशय दुःखद आहे त्याच्या फलंदाजीची शैली कसोटी क्रिकेटमध्ये आदर्श होती त्याची वेळ त्याचं धाडस आणि मोठे मोठे शॉर्ट खेळण्याची कला यांनी त्याला खास बनवले रोहित स्वप्न कायमच भारतासाठी वर्ल्ड कप जिंकण्याचं होतं पण जेव्हा संघ क्वालिफाय करू शकला नाही तेव्हा त्याने निवृत्तीचा कठीण निर्णय घेतला.
लाड यांनी रोहितच्या सुरुवातीच्या दिवसांना आठवत म्हटले, जेव्हा तो फक्त 12 वर्षांचा होता, तेव्हाच मी त्याची असाधारण शैली ओळखली होती. मी त्याला फलंदाजीवर लक्ष देण्याचा सल्ला दिला होता आणि त्याच्या कठोर मेहनतीने आज तो दुनियेतील सर्वश्रेष्ठ फलंदाजांमध्ये एक आहे.
विराट कोहलीच्या निवृत्तीवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, विराटची खेळण्याची शैली आणि त्याची शतकी पारी भारतीय क्रिकेटच्या विजयात कायमच महत्त्वाची ठरलेली आहे. 14 वर्षांपर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या प्रामाणिक खेळाने आणि नेतृत्वाने भारताला नव्या उंचीवर पोहोचवले आहे. त्यांनी विराट आणि रोहितला भारतीय क्रिकेटचे स्तंभ संबोधले. ते म्हणाले, रोहित आणि विराट यांची जोडी मैदानावर कायमच शानदार होती. या दोघांनी केवळ धावा केल्या नाहीत, तर युवा खेळाडूंसाठी आदर्श ठरवला आहे.
दिनेश लाड यांनी काळजी व्यक्त करत म्हटले की, विराट-रोहितसारख्या फलंदाजांची कमी कायमच युवा खेळाडूंना भासत राहणार आहे. या दोघांची जागा घेणे अतिशय अवघड आहे. कसोटी क्रिकेटमध्ये धैर्य, सामर्थ्य आणि मानसिक मजबुतीची गरज असते, जी या दोघांमध्ये खूप होती.
Comments are closed.