IND vs NZ: पहिल्या वनडेत रोहित-विराटचा धमाका, 1-2 नव्हे, तर 5 मोठे रेकॉर्ड्स मोडीत काढत रचला इतिहास!

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील हा पहिला वनडे सामना अतिशय रोमांचक झाला, ज्यामध्ये अनेक मोठे विक्रम मोडीत निघाले. रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहली या दोघांसाठीही हा सामना संस्मरणीय ठरला.

विराट कोहलीने 93 धावांची शानदार खेळी करत ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा किताब पटकावला. दुसरीकडे, रोहित शर्माने 29 चेंडूत 26 धावा केल्या जरी त्याची धावसंख्या मोठी नसली, तरी त्याने काही महत्त्वाचे विक्रम आपल्या नावावर केले.

रोहित शर्माने वडोदरा वनडेमध्ये 2 षटकार मारले. यासह तो वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीर (Opener) म्हणून सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज बनला आहे. रोहितने आपल्या नावावर आणखी एक मोठा विक्रम केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने आता 650 हून अधिक षटकार पूर्ण केले आहेत.

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 28,000 हून अधिक धावा पूर्ण करण्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. या खेळी दरम्यान विराटने श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू कुमार संगकाराचा (Kumar Sangakara) विक्रम मोडीत काढला आणि धावांच्या बाबतीत त्याला मागे टाकले. 93 धावांच्या या खेळीने कोहलीने पुन्हा एकदा सिद्ध केले की तो धावांचा पाठलाग करताना किंवा मोठी धावसंख्या उभारताना किती महत्त्वाचा खेळाडू आहे.

Comments are closed.