रोहितचे अव्वल स्थान अवघ्या 22 दिवसांत निखळले

आयसीसीच्या नव्या वनडे रँकिंगमध्ये हिंदुस्थानी कर्णधार रोहित शर्मा शिखरावरून खाली सरकला आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या सामन्यात विजयी शतक ठोकणाऱ्या न्यूझीलंडच्या डॅरील मिशेलने रोहितला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. 1979 सालानंतर वनडे रँकिंगमध्ये सर्वोच्च स्थानी पोहोचणारा तो पहिला न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ठरला आहे. मिशेलच्या 119 धावांच्या दमदार खेळीने रोहित व अफगाणिस्तानच्या इब्राहिम झदरान यांना अवघ्या एका गुणाने मागे टाकले. त्यामुळे रोहितचे अव्वल स्थानाचे सिंहासन 22 दिवसांचे  ठरले. दरम्यान कसोटी रँकिंगमध्ये हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.

Comments are closed.