दुबई आमचं घर नाही, टीकाकारांना प्रत्युत्तर देताना काय म्हणाला रोहित शर्मा?
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्य फेरीतील भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. दोन्ही संघात 4 मार्च रोजी दुबईच्या स्टेडियमवर सामना खेळवला जाणार आहे. स्पर्धेदरम्यान या गोष्टीची मोठी चर्चा होत आहे की, भारतीय संघ एकाच मैदानावर त्यांचे सर्व सामने खेळत आहे आणि त्या गोष्टीचा त्यांना फायदा होत आहे. तत्पूर्वी रोहित शर्माने या गोष्टींवर टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे.
भारतीय संघाने दुबईमध्ये अ गटातील सामन्यांमध्ये बांगलादेश,पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाला पराभूत करून अंतिम चार संघांमध्ये प्रवेश मिळवला. दुबईमध्ये रिपोर्टर्सशी बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवर प्रत्येक सामन्यात आम्ही वेगवेगळ्या अडचणींना तोंड दिले आहे. ज्यामध्ये त्या परिस्थितीचा सामना करणं संघासाठी अवघड होतं. तसेच खेळपट्टीमध्ये सतत बदल होत होता.
रोहितने इंग्लंड संघाचे माजी कर्णधार नासिर हुसैन आणि मायकल अथर्टन सहित अनेकांना उत्तर दिले आहे. या दिग्गजांनी आरोप केला होता की, भारतीय संघाला एकाच ठिकाणी खेळण्याचा फायदा होत आहे. पाकिस्तानच्याही काही माजी खेळाडूंनी इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल वर आरोप केले होते. त्यानंतर रोहित म्हणाला, आम्ही जे तीन सामने खेळले त्यामध्ये मैदान एकसारखच होतं पण, तिन्ही सामन्यात खेळपट्टीच वातावरण, परिस्थिती वेगळी होती.
पुढे बोलताना रोहित म्हणाला, उपांत्यफेरी सामन्यात आम्हाला माहित नाही की, कोणत्या खेळपट्टीवर खेळायचे आहे. पण जे काही समोर आव्हान असेल ते आम्ही स्वीकारू. हे आमचं घर नाही दुबई आहे. तसेच आम्ही इथे इतके सामने नाही खेळत त्यामुळे इथली खेळपट्टी आमच्यासाठी नवीन आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात आम्ही पाहिले की, जेव्हा गोलंदाज गोलंदाजी करत होते तेव्हा चेंडू हवेत स्विंग करत होता. आम्ही आधीच्या सामन्यात अशी परिस्थिती पाहिली नव्हती. रात्री हवेमध्ये थंडी असते त्यामुळे चेंडू वाऱ्याच्या वेगाने हालचाल करू शकतो.
हेही वाचा
IND vs AUS: उद्या रंगणार सेमीफायनलचा थरार! कधी आणि कुठे पाहायचा लाईव्ह सामना?
दुबईत टीम इंडियाला खरच फायदा? रोहित शर्माने दिले खणखणीत उत्तर!
दुबईत पावसाचा इशारा! भारत-ऑस्ट्रेलिया उपांत्य सामना रद्द होण्याची शक्यता?
Comments are closed.