रोहित-विराटचे 10 महिन्यांनी वनडे पुनरागमन! जाणून घ्या मागच्या मालिकेतील त्यांचा फॉर्म

बीसीसीआयने 23 नोव्हेंबर रोजी भारत–दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचीही निवड करण्यात आली आहे. दोघेही खेळाडू तब्बल 10 महिन्यांनंतर भारतीय भूमीवर वनडे मालिका खेळताना दिसतील. जवळपास दहा महिन्यांनंतर त्यांचा खेळ पुन्हा पाहायला मिळणार आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी भारतीय भूमीवर शेवटची वनडे मालिका फेब्रुवारी 2025 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. या मालिकेत रोहितने 122 धावा केल्या होत्या आणि दुसऱ्या सामन्यात शतकही झळकावले होते. याशिवाय, विराट कोहलीनेही भारतीय सरजमीवर शेवटची वनडे मालिका याच इंग्लंडविरुद्ध फेब्रुवारी 2025 मध्ये खेळली होती, ज्यात त्याने 54 धावा केल्या होत्या. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 30 नोव्हेंबरला खेळला जाईल. दुसरा सामना 3 डिसेंबरला तर तिसरा आणि शेवटचा सामना 6 डिसेंबरला रंगणार आहे.

रोहित-विराट यांनी शेवटची वनडे मालिका ऑस्ट्रेलियन भूमीवर खेळली होती. रोहितने 3 सामन्यांत 101 च्या सरासरीने 202 धावा केल्या होत्या, ज्यात एक शतकही समाविष्ट आहे. तर दुसरीकडे, विराट कोहलीने 3 सामन्यांत 37 च्या सरासरीने 74 धावा केल्या आहेत.

रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, केएल राहुल (कर्णधार) (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, रुतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह, ध्रुव जुरेल.

Comments are closed.