रोहटॅक एसपी निलंबित
वृत्तसंस्था / चंदीगढ
हरियाणाचे एक ज्येष्ठ पोलिस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या आत्महत्येला कारणीभूत ठरण्याचा आरोप असणाऱ्या रोहटक येथील पोलिस निरीक्षकाला कामावरुन निलंबित करण्यात आले आहे. पुरण कुमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत काही अधिकाऱ्यांची नावे नमूद केली आहेत. हे अधिकारी माझ्या आत्महत्येसाठी जबाबदार आहेत, असा मजकूरा या चिठ्ठीत आहे. त्यामुळे हरियाणा प्रशासनाने या सर्व अधिकाऱ्यांच्या विरोधात चौकशीचा आदेश दिला असून रोहटकच्या एसपीला या कारणास्तव निलंबित करण्यात आले आहे.
पुरण कुमार यांनी 6 ऑक्टोबरला स्वत:च्या सर्विस पिस्तुलाने गोळी घालून घेऊन आत्महत्या केली होती. विभागातील अनेक अधिकाऱ्यांनी आपला छळ चालविला होता. आपला अपमान करण्यात येत होता. त्यामुळे आपण आत्महत्या करीत आहोत, असा मजकूर त्यांच्या चिठ्ठीत आढळला आहे. एका ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्याने अशा प्रकारे आत्महत्या केल्याने या घटनेचे जोरदार पडसाद हरियाणाच्या राजकीय आणि पोलीस प्रशासन वर्तुळात उमटत आहेत. सर्व दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Comments are closed.