रोमारियो शेफर्डचा धमाका! सलग 4 चौकार ठोकत रचला नवा इतिहास

आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या सुपर ८ मधील ७ वा सामना दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक (Toss) जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या संघाने २० षटकांत ८ गडी गमावून १७६ धावा केल्या. यामध्ये रोमॅरियो शेफर्ड आणि जेसन धारक यांच्या विक्रमी भागीदारीची अत्यंत महत्त्वाची भूमिका राहिली. याच सामन्यात शेफर्डने वादळी फलंदाजी करत इतिहास रचला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.

​नाणेफेक हारल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. एका टप्प्यावर त्यांनी केवळ ८३ धावांत ७ गडी गमावले होते. अशा परिस्थितीत संघ पूर्ण बाद (All out) होईल की काय, अशी चर्चा सुरू होती. मात्र, अशा कठीण समयी रोमारियो शेफर्ड आणि जेसन होल्डर यांनी जबाबदारी स्वीकारली आणि मोठे फटके खेळण्यास सुरुवात केली. जेसन होल्डरने ३१ चेंडूत ४९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तर ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोमारियो शेफर्डने ३७ चेंडूत 52 धावा नाबाद ठोकल्या. टी-२० वर्ल्ड कपच्या इतिहासात ९ व्या क्रमांकावर फलंदाजी करून अर्धशतक झळकावणारा शेफर्ड हा पहिला फलंदाज ठरला आहे. यासोबतच दोघांमध्ये ९ व्या विकेटसाठी ५७ चेंडूत ८९ धावांची भागीदारी झाली. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ९ व्या विकेटसाठीची ही सर्वात मोठी भागीदारी आहे.

​सुरुवातीच्या फलंदाजांच्या अपयशानंतरही वेस्ट इंडिजच्या संघाने अखेर दक्षिण आफ्रिकेसमोर १७७ धावांचे लक्ष्य ठेवले. आफ्रिकेसाठी यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने ४७ धावांची महत्त्वाची खेळी केली. तर कर्णधार एडन मार्करमने ४६ चेंडूत नाबाद ८२ धावांची खेळी साकारली, ज्यामध्ये ७ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर रायन रिकेल्टननेही २८ चेंडूत ४५ धावा केल्या. यामुळे आफ्रिकेच्या संघाने १६.१ षटकांत केवळ १ गडी गमावून सामना आपल्या नावावर केला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा संघ उपांत्य फेरीत (Semifinal) पोहोचला आहे.

Comments are closed.