IND vs ENG : पाँटिंग-कुकला मागे टाकत, जो रूटकडे ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी!

5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड संघाने 1-0 ने आघाडी घेतलेली आहे. हेंडिंग्लेमध्ये बेन स्टोकच्या नेतृत्वाखाली इंग्लिश संघाने शानदार प्रदर्शन करत 5 विकेट्सने त्यांचा मैदानात विजय मिळवला. बेन डकेटच्या (Ben Duckket) शानदार पारीमुळे इंग्लंड संघाने 371 धावांचं मोठं आव्हान पूर्ण केलं. डकेट शिवाय जॅक क्राउली आणि जो रूटने सुद्धा महत्त्वाचे योगदान दिले. रूटने शानदार फलंदाजी करत 53 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून तो परत गेला. एजबेस्टनमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जो रूटकडे (Jo Root) एक मोठी ऐतिहासिक कामगिरी करण्याची शानदार संधी असणार आहे.

भारतीय संघाविरुद्ध खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीमध्ये जो रूट आधीपासूनच टॉपच्या स्थानावर आहे. त्याने 31 सामन्यांमध्ये 2927 धावा केलेल्या आहेत. दुसऱ्या कसोटी सामन्यात जर रूटने 73 धावा केल्या तर तो टीम इंडिया विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये 3000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरेल. ही कामगिरी आतापर्यंत दुनियेतील कोणत्याच फलंदाजांनी केलेली नाही. रूट नंतर या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर रिकी पॉंटिंगच नाव आहे. ज्याने भारताविरुद्ध खेळत 2255 धावा केल्या आहेत. तसेच एरिस्टर कुक 2431 धावांसोबत तिसऱ्या स्थानावर आहे.

जो रूट एजबेस्टनच्या मैदानावर खूप चांगल्या प्रकारे खेळतो. या ग्राउंडवर रूटने आत्तापर्यंत 9 कसोटी सामने खेळले आहेत, यादरम्यान खेळलेल्या 16 डावांमध्ये त्याने 920 धावा केल्या आहेत, तसेच याच मैदानावर त्याने 3 शतके आणि 5 अर्धशतके सुद्धा झळकावली आहेत. आता इंग्लंड संघाला हीच आशा असेल की, रूट यावेळी सुद्धा या मैदानावर भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात देखील चांगली कामगिरी करण्यात यशस्वी होईल.

हेडिंग्लेमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांचं शानदार प्रदर्शन राहील. या संघाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात त्यांची दुसरी सर्वात मोठी धावसंख्या पूर्ण केली आणि 5 विकेट्सने विजय मिळवला.

Comments are closed.