राज्य मानांकन कॅरम- दिग्गजांची आगेकूच

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

संतोष मर्चंड, शांतीलाल जातिया, गिरीधर भोज आणि योगेश केरकर यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर आयोजित व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती, जुहू यांच्या सहकार्याने सुरू झालेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या दुसऱया फेरीत दमदार प्रवेश केला. मर्चंड यांनी किरण बोबडेवर, जातिया यांनी नरेंद्र तरेवर, भोज यांनी विश्वनाथ शिवलकरवर तर केरकर यांनी शंकर सावर्डेकरविरुद्ध संघर्षपूर्ण विजय मिळवला.

सुमारे 500 खेळाडूंचा सहभाग असलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे उद्घाटन रोटेरियन भालचंद्र बर्वे आणि अजित दुबे यांनी खेळलेल्या प्रतीकात्मक डावाने झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद प्रभू, डॉ. हेमंत मोंडकर, महाराष्ट्र कॅरम संघटनेचे सचिव अरुण केदार आणि मुंबई उपनगर कॅरमचे कार्याध्यक्ष संतोष चव्हाण उपस्थित होते.

Comments are closed.