RCB vs DC: आरसीबीने जिंकला टाॅस, दिल्लीला फलंदाजीचे आमंत्रण!
यंदाच्या आयपीएल हंगामातील 46व्या सामन्यात आज (27 एप्रिल) रजत पाटीदारच्या नेतृत्वाखालील राॅयल चॅलेंजर्स बंगळरू आणि अक्षर पटेलच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने असणार आहेत. (RCB vs DC) दरम्यान दोन्ही संघ दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर भिडताना दिसतील. दरम्यान आरसीबी कर्णधार रजत पाटीदारने टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11-
रॉयल चॅलेंज बंगलोर- विराट कोहली, जेकब बेथेल, रजत पाटीदार (कर्नाधर), जिश शर्मा (अॅडव्होक्टर), टिम डेव्हिड, खुरोनल पांड्या, रोमियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयाश शर्मा, जोश हजलवुड, यश दैलवुड
दिल्ली कॅपिटल्स- फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, करुन नायर, केएल राहुल (यशर रक्ष), अक्षर पटेल (कर्नाधर), ट्रिस्टन स्टॅब्स, विप्रज निगम, मिशेल स्टार्क, दुश्मण्था चमेरा, कुल्डीप यादव, मुखुमार
दिल्लीने यंदाच्या आयपीएल हंगामात आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. त्यामध्ये संघाने चमकदार कामगिरी केली आहे. संघाने 8 सामन्यात 6 विजय मिळवले आहेत. तर दिल्लाने केवळ 2 सामने गमावले आहे. दिल्लीचा संघ गुणतालिकेत 12 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.
दुसरीकडे रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीने देखील चमकदार कामगिरी केली. आरसीबीने 9 सामन्यात 6 विजय मिळवले आहेत. तर 3 सामने गमावले आहेत. आरसीबीचा संघ गुणतालिकेत 12 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. या हंगामात जेव्हा दिल्ली आणि आरसीबी आमने-सामने आले होते, त्यावेळी दिल्लीने दमदार विजय मिळवला होता. आज आरसीबीची संघ नक्कीच पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान आजच्या सामन्यात जो संघ बाजी मारेल तो संघ प्लेऑफच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकेल.
Comments are closed.