महिला रेल्वे प्रवाशांच्या मदतीला ‘सखी’ धावणार; पश्चिम रेल्वेवर सुरक्षेसाठी आरपीएफचे 11 व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) मुंबई उपनगरीय विभागातील महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘सखी’ हा विशेष व्हॉट्सअॅप ग्रूप उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत महिला प्रवासी आपत्कालीन परिस्थितीत थेट महिला आरपीएफ अधिकाऱ्यांशी संपर्प साधून तत्काळ मदत मिळवू शकणार आहेत. आरपीएफने आतापर्यंत चर्चगेट ते डहाणूदरम्यान एपूण 11 व्हॉट्सअॅप ग्रूप्स तयार केले असून या माध्यमातून जवळपास 1500 नियमित महिला प्रवासी थेट आरपीएफच्या संपका&त राहणार आहेत.

उपनगरी रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागते. महिलांच्या राखीव डब्यात पुरुषांची घुसखोरी, चोरी, छेडछाड आदी गंभीर प्रकार लोकल प्रवासात घडतात. त्याच अनुषंगाने अलीकडेच ‘सखी’ व्हॉट्सअॅप ग्रूप उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. महिला उपनिरीक्षक किंवा सहाय्यक महिला उपनिरीक्षक असे महिला अधिकारीच व्हॉट्सअॅप ग्रूपचे नेतृत्व करीत आहेत. महिला लोकल प्रवासात कोणत्याही गैरप्रकाराची तक्रार ग्रूपवर करू शकणार आहेत. ग्रुपवर प्रवासातील फोटो, स्थानकाचे नाव आणि अपेक्षित मदतीची माहिती दिल्यास आरपीएफचे जवान पुढच्या एक-दोन स्थानकांतच संबंधित लोकल ट्रेनमध्ये महिला प्रवाशाच्या मदतीसाठी दाखल होणार आहेत.

महिलांच्या डब्यातील ६१९५ घुसखोरांना दणका

आरपीएफने महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कारवाईची कठोर पावले उचलली आहेत. पश्चिम रेल्वेच्या उपनगरी विभागात गेल्या सहा महिन्यांत 6,195 घुसखोरांवर रेल्वे कायद्याच्या कलम 162 अन्वये कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 13 लाख 84 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

महिला प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत मिळणे आवश्यक आहे. याच हेतूने दिव्यांग प्रवाशांच्या ग्रूपच्या धर्तीवर महिला प्रवासी सुरक्षेसाठी ‘सखी’ व्हॉट्सअॅप ग्रूप्स कार्यरत असतील. ‘रेल मदत’च्या 139 हेल्पलाईनबरोबरच हा तत्काळ मदत मिळवून देणारा उपक्रम सुरू राहील. ‘सखी’ ग्रूपमध्ये अधिकाधिक नियमित महिला प्रवाशांना सहभागी करून घेतले जात आहे.

n चांदी पुंडगीर, सुरक्षा आयुक्त, रेल्वे संरक्षण दल सेवा मुंबई विभाग

Comments are closed.