रामदास आठवलेंचा भाजपला धक्का, मुंबईत रिपाईचे 39 उमेदवार रिंगणात उतरवले, यादी वाचा एका क्लिकवर
बीएमसी निवडणूक 2026 रामदास आठवले: अनेकदा इशारे देऊनही मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या जागावाटपात शेवटपर्यंत रिपाईला झुलवत ठेवणाऱ्या भाजप-शिवसेनेच्या महायुतीला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मोठा झटका दिला आहे. रामदास आठवले यांनी महायुतीने जागावाटपात आपल्याशी विश्वासघात केल्याचा आरोप रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केला होता. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपाईला भाजपच्या कोट्यातून जागा देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असूनही त्यावर कार्यवाही न झाल्याने आता रामदास आठवले यांनी राजकीय बॉम्ब टाकला आहे. रामदास आठवले यांच्या रिपाईने मुंबई महानगरपालिकेसाठी 39 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. हा भाजप आणि शिंदे गटासाठी झटका मानला जात आहे. (Mumbai Candidates list)
मुंबईतील विशिष्ट भागांमध्ये रामदास आठवले यांना मानणारा आंबेडकरी समाज आहे. रामदास आठवले यांच्यामुळे हा समाज आतापर्यंत महायुतीच्या पाठिशी उभा राहिला आहे. मात्र, आता रामदास आठवले यांनी स्वतंत्रपणे रिपाईचे उमेदवार रिंगणात उतरवल्यास दलित टक्का जास्त असलेल्या मुंबईतील वॉर्डांमध्ये भाजप आणि शिंदे गटाची डोकेदुखी वाढू शकते. भाजप- शिंदे गटाने आपल्याला 7 जागा द्यायचे कबुल केले होते. मात्र, दोन्ही पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारी यादीत रिपाईच्या एकाही उमेदवाराचा समावेश नाही. त्यामुळे रिपाईने मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे, असे रामदास आठवले यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. महानगरपालिकेच्या निवडणुकीत 100-200 मतंही निर्णायक ठरु शकतात. त्यामुळे रामदास आठवले यांच्या रिपाईला सोबत ठेवण्यासाठी आता भाजप काय पावले उचलणार हे बघावे लागेल.
Ramdas Athawale RPI Candidates in Mumbai: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) मुंबईतील उमेदवारांची यादी
- स्नेहा सिद्दार्थ कासारे- वॉर्ड क्रमांक 186
- रॉबिन्सन मॅरॉन नयागम- प्रभाग 188
- बापूसाहेब योहान काळे- वॉर्ड क्रमांक 181
- सचिनभाई मोहिते- वॉर्ड क्रमांक 200
- रमेश शंकर सोनावणे- वॉर्ड क्रमांक 146
- दिक्षा गायकवाड- वॉर्ड क्रमांक 152
- ज्योती जेकटे- वॉर्ड क्रमांक 155
- प्रज्ञा सदाफुले- वॉर्ड क्रमांक 147
- संजय डोळसे- वॉर्ड क्रमांक 153
- संजय इंगळे- वॉर्ड क्रमांक 154
- निलीमा मानकर- वॉर्ड क्रमांक 198
- गणेश वाघमारे- वॉर्ड क्रमांक 210
- विनोदकुमार साहू- वॉर्ड क्रमांक 223
- मनोहर कुलकर्णी- वॉर्ड क्रमांक 214
- श्रावण मोरे- वॉर्ड क्रमांक 90
- मनिषा संजय डोळसे- वॉर्ड क्रमांक 153
- नितीन कांबळे- वॉर्ड क्रमांक 89
- सचिन कासारे- वॉर्ड क्रमांक 93
- विक्रांत विवेक पवार- ९८ उत्तर मध्य मुंबई
- नम्रता बाळासाहेब गरुड-उत्तर मध्य मुंबई
- विनोद भाऊराव जाधव-१०४- उत्तर मध्य मुंबई
- रागिणी प्रभाकर कांबळे, १०३- ईशान्य मुंबई
- राजेश सोमा सरकार- १२०, ईशान्य मुंबई
- हेमलता सुनील मोरे- 118, ईशान्य मुंबई
- राजेंद्र कृष्णा गांगुर्डे, १२५, ईशान्य मुंबई
- भारती भागवत डोके, १३३, ईशान्य मुंबई
- सतिश सिध्दार्थ चव्हाण, १४०, ईशान्य मुंबई
- यशोदा शिवराज कोंडे, २८, उत्तर मुंबई
- अभिजित रमेश गायकवाड, २६, उत्तर मुंबई
- रेश्मा अबू खान, 54 उत्तर मुंबई
- छाया संजय खंडागळे ८१ उत्तर पश्चिम
- अजित मुसा कुट्टी, ५९- उत्तर पश्चिम
- जयंतीलाल वेलजी गडा, ६५- उत्तर पश्चिम
- बाबू आशापा धनगर, ६३- वायव्य
- वंदना संजय बोरोडे, 38- वायव्य
- राधा अशोक यादव, 39- वायव्य
- प्रेमलता जितेंद्र शर्मा, 40- वायव्य
- धनराज वैद्यनाथ रोड, 43- वायव्य
- शिल्पा बेलमकर- प्रभाग क्रमांक 150
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.