लाडकी बहीण योजनेत घोळ! अपात्र लाभार्थ्यांनी लाटले 165 कोटी रुपये, मंत्री अदिती तटकरेंची कबुली

विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा आणली आणि निवडणुकांपूर्वी लाडक्या बहिणींना सरसकट पैसे दिले. मात्र, या योजनेचा लाभ निकषात न बसणाऱ्या महिलांनीही घेतल्याचे उघड झाले. आत्तापर्यंत 165 कोटी रुपये अपात्र लाभार्थ्यांनी लाटल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये सरकारी नोकरदरांशिवाय 12 हजार 431 पुरुषांचा समावेश आहे. शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून या पैशांची वसुली करून त्यांच्यावरती योग्य कारवाई केली जाणार असल्याची माहिती विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात लेखी उत्तरातून मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.

राज्याच्या अनेक जिल्ह्यांत अपात्र महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. यादरम्यान महायुती सरकारकडे निधी नसल्याने आता लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. यामध्ये 12 हजार 431 पुरुषांनी 25 कोटी रुपये तर 77 हजार अपात्र महिलांनी 140 कोटी, तर 9526 शासकिय महिला कर्मचाऱ्यांनी 14.50 कोटी रुपये लाटल्याचं आदिती तटकरेंनी माहिती देताना सांगितलं आहे.

लाडकी बहीण योजना सुरू केल्यापासून सरसकट महिलांनी अर्ज दाखल केले. या अर्जात सुरूवातीला आधार क्रमांक, बँक खाते आणि पात्रतेची माहिती तपासणी सुरू झाली. यावेळी डेटा व्हेरिफिकेशनमध्ये त्रुटी आढळून आल्याने अपात्र महिलांनीही अर्ज करून लाभ घेतला, अशी माहिती समोर आली आहे. याशिवाय पुरुषांनी केलेले अर्जही ग्राह्य धरण्यात आले.

सरकारने हा सर्व प्रकार डिजिटल सिस्टममधील त्रुटी आणि स्थानिक प्रशासनाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे घडल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या योजनेचा फक्त पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी नवीन अटींची पुर्तता करण्यात आली. यानंतर पुन्हा तपासणी केली असता शासकिय महिला देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले. शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याकडून या पैशांची वसुली करून त्यांच्यावरती रितसर कारवाई केली जाणार असल्याचेही अदिती तटकरे म्हणाल्या. आहे.

‘लाडकी बहीण’चा शेतकऱ्यांच्या ‘महासन्मान’ला अडसर, सांगलीतील पावणेचार लाख शेतकऱ्यांना हप्त्याची प्रतीक्षा

Comments are closed.