रेसकोर्स सेंट्रल पार्क ते सायन्स सेंटर-कोस्टल रोडला जोडणार 702 कोटींचा भूमिगत मार्ग, ‘एमएमआरसीएल’ करणार काम, पालिका करणार खर्च

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महालक्ष्मी रेसकोर्स येथे बांधण्यात येणारे प्रस्तावित सेंट्रल पार्क, सायन्स सेंटर आणि कोस्टल रोडला जोडण्यासाठी भूमिगत मार्ग बांधण्यासाठी पालिका 702 कोटी 44 लाख 35 हजार रुपयांचा खर्च करणार आहे. या भूमिगत मार्गाचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड करणार असून पालिका निधी देणार आहे. याबाबतचा प्रस्ताव आगामी स्थायी समितीत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

महालक्ष्मी येथे पालिकेच्या माध्यमातून सेंट्रल पार्क बांधणे प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर महालक्ष्मी रेसकोर्स मार्गे अॅक्वालाईनच्या सायन्स सेंटर मेट्रो स्थानक ते सागरी किनारा मार्गाच्या विहार पथापर्यंत भूमिगत पादचारी मार्ग बांधण्यासाठी तत्कालीन मुंबई महापालिका आयुक्तांच्या दालनात 28 जुलै 2025ला बैठक पार पडली होती. या बैठकीला अप्पर मुख्य सचिव, मुंबई विकास रेल्वे कॉर्पोरेशनचे अधिकारी, एमएमआरसीएलचे अधिकारी, एमएमआरसीएलच्या व्यवस्थापकीय संचालक आणि विद्यमान महापालिका आयुक्त अश्विनी भिडेही उपस्थित होत्या. या वेळी भुयारी मार्ग बांधण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली होती. या वेळी पालिका आणि एमएमआरसीएलमध्ये सामंजस्य करारही करण्यात आला होता.

पालिकेच्या खर्चाला काँग्रेसचा विरोध

हा मार्ग एमएमआरसीएल बांधत असताना पालिकेने खर्च का करावा, असा सवाल उपस्थित करीत पालिकेकडून होणाऱया खर्चाला काँग्रेसने विरोध केला आहे. एकीकडे पालिका स्वतः मोठे प्रकल्प राबवत असताना या खर्चाचा भारही पालिकेने का उचलावा, असा सवाल काँग्रेसचे पालिकेतील गटनेते अश्रफ आझमी यांनी उपस्थित केला आहे.

Comments are closed.