RSS disagrees with Mohan Bhagwat temple-mosque statement PPK


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी प्रत्येक मशिदीखाली मंदिर शोधू नका, असा सल्ला दिला होता. त्यांचे हे विधान आता आरएसएसलाही पटले नसल्याचे समोर आले आहे.

मुंबई : राम मंदिर हा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे, म्हणून मंदिर बांधले. मात्र रोज नवा मुद्दा उपस्थित करून प्रत्येक मंदिराखाली मशीद शोधले तर कसे होईल? आपण एकत्र राहू शकतो हा संदेश भारताने देण्याची गरज आहे, असे मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. ज्यानंतर त्यांच्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला. महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या विधानाबाबत स्वामी रामभद्राचार्य, ज्योतिर्मठचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी आक्षेप घेत त्यांना खडेबोल सुनावले. त्यानंतर आता खुद्द आरएसएसनेच त्यांच्या या विधानाशी असहत असल्याचे म्हटले आहे. तर याबाबतचा लेखही आरएसएसचे नियतकालिक असलेल्या ऑर्गनायझरमध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. (RSS disagrees with Mohan Bhagwat temple-mosque statement)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी प्रत्येक मशिदीखाली मंदिर शोधू नका, असा सल्ला दिला होता. तर काही लोकांना राम मंदिरासारखे मुद्दे उपस्थित करून हिंदूंचे नेते बनायचे आहे. पण असे होऊ दिले जाऊ शकत नाही, असे भागवत यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले. ज्यानंतर त्यांच्या या वक्तव्याचा अनेकांनी समाचार घेतला. आता आरएसएसनेच याबाबतची नाराजी व्यक्त केली आहे. आरएसएसचे नियतकालिक असलेल्या ऑर्गनायझरमध्ये संभलच्या प्रकरणाची कव्हर स्टोरी करण्यात आली आहे. या स्टोरीला ऑर्गनायझरमध्ये प्रथम क्रमांकावर घेण्यात आले असून ‘सभ्यतेची लढाई’ असे याला शिर्षक देण्यात आले आहे. तर ही लढा कोणाचाही व्यक्तिगत आणि सामाजिक हक्क आहे, असे यामधून स्पष्टपणे लिहिण्यात आले आहे.

– Advertisement –

हेही वाचा… BJP vs Congress : CWC सत्रात भारताचा नकाशा चुकीचा; नवी मुस्लिम लीग म्हणत भाजपची काँग्रेसवर टीका

तर, कोणीही त्यांची प्रार्थनास्थळे मुक्त करण्यासाठी कायदेशीर कारवाईची मागणी करू शकतात. यामध्ये चुकीचे असे काय आहे? हा आपल्या सर्वांना संविधानामुळे मिळालेला अधिकार आहे, असे ऑर्गनायझरच्या लेखात म्हटले आहे. तसेच, सोमनाथ ते संभलपर्यंतच्या लढ्याचा यामध्ये संबंध जोडण्यात आला आहे. ऑर्गनायझरच्या कव्हर पेजवरही संभळचे छायाचित्र लावण्यात आले आहे. तर, संभलमध्ये जिथे एकेकाळी श्री हरिहर मंदिर होते, तिथे आता जामा मशिद बांधण्यात आली आहे. ज्यामुळे आता एका उत्तर प्रदेशात नव्या वादाला तोंड फुटले आहे.


Edited By Poonam Khadtale



Source link

Comments are closed.