भाजपच्या त्रिसूत्री भाषा धोरणाला RSS चा विरोध, फडणवीस मराठी माणसावर हिंदीची सक्ती का करत आहेत? संजय राऊत यांचा सवाल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेकडून राज्यातील हिंदी सक्तीविरोधात आंदोलन पुकारताच सरकारने सपशेल माघार घेत हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केला. याच मुद्द्यावर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या त्रिसूत्री भाषा धोरणाला आरआरएसचाही विरोध आहे.
आज दिल्लीत आरआरएसने पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांना संबोधित करताना आरआरएसने त्रिसूत्री भाषा धोरणाबद्दल बोलताना म्हटलं आहे की, आरआरएसची खूप आधीपासून अशी भूमिका आहे की, हिंदुस्थानातील प्रत्येक भाषाही राष्ट्रीय भाषा आहे. प्रत्येक जण आपल्या भागात आपल्याच भाषेत बोलतो. प्रत्येकाचा आग्रहही आहे की, प्रथमिक शिक्षण हे आपल्याच भाषेत व्हावे.
यावरच आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी X वर एक पोस्ट करत म्हटलं आहे की, “भारतीय जनता पक्षाच्या त्रिसूत्री भाषा धोरणाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध! मग फडणवीस मराठी माणसावर हिंदीची सक्ती का करत आहेत? प्रत्येक भाषा ही राष्ट्र भाषा असल्याचे संघाचे म्हणणे! मग महाराष्ट्रात भाषे वरून भांडणे का लावली जात आहेत?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
Comments are closed.