‘कांतारा’ फेम अभिनेत्रीचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल, डीपफेक करणाऱ्यांना दिला कायदेशीर कारवाईचा इशारा
सोशल मीडियावर सध्या कलाकारांना टार्गेट करण्यासाठी डीपफेक आणि एआय तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर केला जात आहे. याचाच फटका आता ‘कांतारा – चॅप्टर 1’ या चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या दाक्षिणात्य अभिनेत्री रुक्मिणी वसंत हिला बसला आहे. रक्मिणी वसंत हिचे एआय-जनरेटेडे बिकिनी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावर तिने तीव्र संताप व्यक्त केला असून हे फोटो पूर्णपणे बनावट असल्याचे म्हटले आहे. तसेच दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही तिने दिला आहे.
शुक्रवारी संध्याकाळी रुक्मिणी वसंत हिचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. यामध्ये रुक्मिणी स्विमिंग पूलमध्ये ग्रीन बिकिनी घालून फोटोशूट करताना दाखवण्यात आले आहे. हे व्हिडिओ इतक्या हुबेहूब पद्धतीने तयार केले होते की अनेक युजर्सना ते खरे वाटले आणि सोशल मीडियावर यावर उलट-सुलट चर्चा सुरू झाली. हा प्रकार समोर आल्यानंतर रुक्मिणीने तात्काळ तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम स्टोरीवर एक प्रसिद्धीपत्रक जारी करत व्हायरल फोटोंशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
जर तुमचे मन इट्स रिअल किंवा एआय मध्ये गोंधळले असेल तर..
विश्वास ठेवा तुमचा Dk सुद्धा ओळखणार नाही… त्यासाठी जा 💦 pic.twitter.com/3wwo2guPcQ
— इंडियन सेलेब हब (@IndCelebHub) 22 मे 2026
माझ्या टीमला आणि मला सोशल मीडियावर माझे नाव सांगून पसरवले जाणारे काही एआय-जनरेटेड फोटो आढळून आले आहेत. मला हे स्पष्ट करायचे आहे की हे फोटो पूर्णपणे खोटे आणि बनावट आहेत. अशा प्रकारे तंत्रज्ञानाचा गैरवापर करून मॉर्फ केलेले फोटो तयार करणे आणि ते पसरवणे हा अत्यंत बेजबाबदारपणा आहे आणि यामुळे माझ्या गोपनीयतेचा भंग झाला आहे. आम्ही ही बाब अत्यंत गांभीर्याने घेतली आहे. हे बनावट फोटो तयार करणाऱ्या आणि ते सोशल मीडियावर पसरवणाऱ्यांविरुद्ध आम्ही सायबर सेल आणि आवश्यक ती कायदेशीर कारवाई करत आहोत. मी सर्वांना विनंती करते की अशा खोट्या फोटोंवर विश्वास ठेवू नका आणि ते पुढे शेअर करणे टाळा, असे आवाहन रुक्मिणी वसंत हिने केले आहे.
कोण आहे रुक्मिणी वसंत?
रुक्मिणी वसंत कन्नड चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. 2019 मध्ये ‘बिरबल ट्रिलोजी’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले. ‘सप्त सागरदाचे अॅलो – साईड ए आणि साईड बी’ या चित्रपटातील प्रियाच्या भूमिकेसाठी तिला 2023 चा ‘फिल्मफेअर क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कन्नड’ पुरस्कार तिला मिळाला होता. ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा: चॅप्टर 1’ मध्ये ती राजकुमारी कनकवतीच्या भूमिकेत दिसली. याशिवाय दिग्दर्शक प्रशांत नील यांच्या ‘ड्रॅगन’ चित्रपटात ती ज्युनियर एनटीआर सोबत, तर सुपरस्टार यशच्या बहुचर्चित ‘टॉक्सिक’ चित्रपटातही ती मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

Comments are closed.