LPG ते पेट्रोल-डिझेलपर्यंत… उद्यापासून देशात बदलणार ‘हे’ पाच मोठे नियम; तुमच्या खिशावर काय प
नियम बदल: आज मे महिन्याचा शेवटचा दिवस असून उद्या 1 जून 2026 पासून नवीन महिन्याची सुरुवात होत आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला देशात अनेक आर्थिक आणि व्यावसायिक नियम बदलत असतात. उद्यापासून (1 जून) सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी आणि खिशाशी संबंधित 5 मोठे बदल (Financial Changes) लागू होणार आहेत. यामध्ये एलपीजी सिलेंडर, पेट्रोल-डिझेल, बँकिंग आणि कारच्या किमतींचा समावेश आहे. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या बजेटवर होणार आहे. उद्यापासून नेमके कोणते बदल होणार? सविस्तर जाणून घेऊया…
1. एलपीजी सिलेंडरशी संबंधित 2 मोठे बदल (LPG Cylinder Rule)
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल विपणन कंपन्या (Oil Marketing Companies) एलपीजी सिलेंडरचे नवीन दर जाहीर करतात. मध्य पूर्व आशियातील संकटामुळे गेल्या काही महिन्यांत सिलेंडरच्या किमती वाढल्या होत्या. सध्या दिल्लीत 14 किलोचा घरगुती सिलेंडर 913 रुपयांना, तर 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर 2078 रुपयांना मिळत आहे. उद्या यामध्ये बदल होऊ शकतो.
दुसरा मोठा बदल: जर तुमच्याकडे पीएनजी (PNG – पाईप्ड नॅचरल गॅस) आणि एलपीजी (LPG) दोन्ही कनेक्शन असतील, तर तुम्हाला एलपीजी कनेक्शन सरेंडर (Surrender) करावे लागेल. जे लोक एलपीजी सरेंडर करत नाहीत, अशांची ओळख पटवून उद्यापासून त्यांचे गॅस कनेक्शन रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
2. पेट्रोल-डिझेलआणि हवाई इंधनावरील नवीन निर्यात शुल्क (Export Duty)
पश्चिम आशियातील तेल संकट लक्षात घेता, केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि हवाई इंधन (ATF) च्या निर्यातीवर नवीन शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, जो 1 जून 2026 पासून लागू होईल. सरकारी अधिसूचनेनुसार, उद्यापासून पेट्रोलच्या निर्यातीवर 1.5 रुपये प्रति लीटर, डिझेलवर 13.5 रुपये प्रति लीटर आणि एटीएफवर 9.5 रुपये प्रति लीटर इतके नवीन निर्यात शुल्क (Export Duty) मोजावे लागेल. याचा थेट परिणाम हवाई प्रवासाच्या तिकिटांवर होऊ शकतो.
3. एचडीएफसी बँकेचे नवीन नियम आणि शुल्क (HDFC Bank Charges)
HDFC बँक उद्यापासून चालू खाते (Current Account) आणि इतर खात्यांशी संबंधित कॅश डिपॉझिटचे नियम बदलत आहे. आतापर्यंत लहान नोटा आणि नाणी जमा करण्यावर कोणतीही मासिक मर्यादा नव्हती. परंतु नवीन नियमांनुसार, 20 रुपये किंवा त्याहून कमी मूल्याच्या नोटांसाठी दरमहा 10,000 रुपये आणि नाण्यांसाठी 5,000 रुपयांची मर्यादा (Monthly Limit) निश्चित करण्यात आली आहे. या मर्यादेपेक्षा जास्त रक्कम किंवा नाणी जमा केल्यास 2 टक्के अतिरिक्त शुल्क (Extra Charge) आकारले जाईल.
4. सोलर पॅनेलशी संबंधित नवीन यादी लागू (Solar Panel ALMM List)
1 जून 2026 पासून सोलर पॅनेलसाठी केंद्र सरकारची मान्यताप्राप्त मॉडेल आणि उत्पादकांची यादी (ALMM List-II) लागू होणार आहे. आता सरकारी योजना आणि अनुदानावर (Subsidy) चालणाऱ्या प्रकल्पांमध्ये केवळ याच यादीतील सोलर मॉड्यूल आणि सेलचा वापर करता येईल. गुणवत्तेचा दर्जा सुधारण्यासाठी हे पाऊल उचलले गेले असून, यामुळे सोलर पॅनेलच्या किमती (Solar Panel Price) वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
5. मारुती सुझुकीच्या कार महागणार (Maruti Suzuki Cars Price Hike)
जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर उद्यापासून तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागतील. देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) आपल्या गाड्यांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली होती, जे नवीन दर उद्यापासून लागू होतील. ऑल्टोपासून ते ब्रेझा आणि व्हिक्टोरिसपर्यंतच्या विविध मॉडेल्सवर जास्तीत जास्त 30,000 रुपयांपर्यंतची वाढ (Price Hike) करण्यात आली आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.