रेल्वे तिकीट, एलपीजी, UPI ते सिम नियमांपर्यंत… 1 मार्चपासून बदलणार ‘हे’ नियम; तुमच्या खिशावर

नियम बदल: दर महिन्याच्या सुरुवातीला काही ना काही आर्थिक बदल होत असतात, ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या मासिक खर्चावर होतो. मार्च 2026 पासूनही एलपीजी गॅस, रेल्वे तिकीट, सिम नियम, UPI व्यवहार आणि बँक खात्यातील किमान शिल्लक यांसारख्या अनेक महत्त्वाच्या बाबींमध्ये बदल होणार आहेत. हे बदल तुमच्या खिशावर थेट परिणाम करू शकतात.

LPG Gas Price: एलपीजी गॅस सिलेंडरचे दर

दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता असते. मागील काही महिन्यांपासून प्रामुख्याने 19 किलोच्या व्यावसायिक (कमर्शियल) गॅस सिलेंडरच्या दरात चढ-उतार दिसून येत आहे. गेल्या महिन्यात कंपन्यांनी सुमारे 49 रुपयांनी दरवाढ केली होती. मार्चमध्येही दरात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे दर मात्र सध्या स्थिर आहेत.

Railway Ticket Booking: रेल्वे तिकीट बुकिंग नियमात बदल

1 मार्च 2026 पासून जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकीट बुकिंगसंदर्भातील नियम बदलणार आहेत. भारतीय रेल्वेचा जुना UTS अॅप बंद केला जाऊ शकतो. त्याऐवजी ‘RailOne’ नावाचे नवीन अॅप पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. या अॅपवर जनरल तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि स्थानिक प्रवासाशी संबंधित सर्व सुविधा उपलब्ध असतील.

SIM Binding: सिम बाइंडिंगचा नवा नियम

डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी सरकार 1 मार्चपासून सिम बाइंडिंगचा नवा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. या नियमानुसार WhatsApp, Telegram आणि Signal सारखी अॅप्स थेट मोबाईल सिमशी जोडली जातील. जर मोबाईलमधून सिम काढले तर ही अॅप्स तात्काळ बंद पडतील. वाय-फाय किंवा अन्य नेटवर्कद्वारेही सिमशिवाय ही अॅप्स वापरता येणार नाहीत.

UPI : यूपीआय व्यवहार अधिक सुरक्षित

1 मार्चपासून डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित करण्यासाठी मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर अतिरिक्त सुरक्षा उपाय लागू केले जाणार आहेत. केवळ UPI PIN पुरेसा नसेल, तर उच्च मूल्याच्या व्यवहारांसाठी बायोमेट्रिक किंवा मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य होऊ शकते.

Bank : किमान शिल्लक नियमात बदल

देशातील मोठ्या सरकारी बँका 1 मार्च 2026 पासून किमान शिल्लक (Minimum Balance) नियमात बदल करणार आहेत. पूर्वी एखाद्या दिवशी खात्यात शिल्लक कमी असल्यास दंड आकारला जात होता. आता मात्र सरासरी मासिक शिल्लक (Average Monthly Balance) यावर आधारित दंड आकारला जाईल.

CNG, PNG आणि ATF दरात बदल शक्य

पेट्रोलियम वितरक कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी CNG, PNG आणि विमान इंधन (ATF) दरात बदल करतात. 1 मार्चपासून या दरांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

Bank Holiday In March: होळी, गुढीपाडवापासून रमजान, राम नवमीपर्यंत…; मार्च महिन्यात 11 दिवस बँकांचे कामकाज बंद, जाणून घ्या, A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.