आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं
जलगाव बातम्या: धार्मिक स्थळाजवळील पाण्याची टाकी आणि माठाची तोडफोड करणाऱ्या प्रवीण कोळीला (Pravin Koli) जामीन मिळणार असल्याच्या अफवेने आज जळगाव न्यायालयाच्या (Jalgaon Court) परिसरात काही वेळासाठी मोठा तणाव निर्माण झाला होता. कोर्टाबाहेर घोषणाबाजी देखील करण्यात आली. प्रवीण कोळीवर हल्ला होऊ शकतो, ही गोष्ट लक्षात पोलिसांच्या (Police) सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला. धार्मिक स्थळाजवळ तोडफोड करणाऱ्या प्रवीण कोळीला तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वाल्मिक नगरातील मुलाच्या अपहरण प्रकरणातील संशयित आरोपीच्या शोधार्थ गेलेल्या प्रवीण कोळीने धार्मिक स्थळाजवळ तलवारीने पाण्याची टाकी आणि माठाची तोडफोड केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयात कोठडी ऐवजी प्रवीणला जामीन मिळणार असल्याची अफवा पसरताच, मोठा जमाव न्यायालय परिसरात जमला होता.
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला
कोर्टाबाहेर किरकोळ घोषणाबाजी देखील करण्यात आली. दरम्यान प्रवीण कोळीवर हल्ला होऊ शकतो ही गोष्ट लक्षात येताच पोलिसांनी तीन दंगा नियंत्रक पथक तसेच एक क्यूआरटी पथक बोलवून बंदोबस्त वाढवून घेतला. यानंतर कोर्ट परिसरातील जमावाला पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून शांत केले.
प्रवीण कोळीला तीन दिवसांची पोलीस कोठडी
पोलिसांनी सतर्कता दाखवित जमावाला कोर्ट परिसरापासून बाहेर काढण्यात यश मिळविले. न्यायालयाने प्रवीण कोळीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यानंतर परिसरातील तणाव निवळला. परंतु या घटनेमुळे काही वेळ कोर्ट परिसरात मोठ्या तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
केळी विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला
दरम्यान, अमळनेर शहरातील फळ गल्ली, कुंठे रोड येथे केळी विक्रेत्यावर प्राणघातक हल्ल्याची घटना घडली. व्यवसायिक वादातून चार आरोपींनी तरुण फळ विक्रेत्यावर चाकूने हल्ला केला. याप्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाहिद रहीम बागवान (18) रा. अब्बासिया मस्जिद जवळ बाहेपुरा अमळनेर हा केळी विक्रीचा व्यवसाय करतो. त्याचा व्यवसाय चांगला चालत असल्याने आरोपींनी त्याच्यावर वारंवार दबाव आणण्याचा प्रयत्न केला. 15 मार्च रोजी संध्याकाळी 5.30 वाजता रईस राजू बागवान रा. शाहआलनगर व त्याच्या साथीदारांनी किरकोळ कारणावरून शाहिद बागवान याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर शाहरूख हनीफ बागवान याने लोखंडी टरबूज कापण्याच्या चाकूने त्याच्या मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शाहिदने तो वार डाव्या हाताने अडवल्याने हात जखमी झाला आणि चाकूचा वार कपाळावर लागला. पोलिसांनी शाहिद बागवानच्या तक्रारीवरून रईस बागवान, राजू बागवान, अनिस हनीफ बागवान आणि शाहरूख हनीफ बागवान या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38
आणखी वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.