सोमवती अमावस्येला खरोखरच तंत्रमंत्रासाठी अनामिका कापली होती का? रुपाली चाकणकरांनी अखेर मौन सोडल
रुपाली चाकणकर आणि सुषमा अंधारे : विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्या सांगण्यावरुन राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सोमवती अमावस्येला स्वत:च्या हाताचे बोट (अनामिका) Ring Finger कापून घेतली होती, असा आरोप ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला होता. रुपाली चाकणकर या अघोरी विद्या करतात. 2 सप्टेंबर 2024 ला रोजी सोमवती अमावस्या होती. यादिवशीच रुपाली चाकणकरांनी (Rupali Chakankar) हाताची अनामिका कापली होती. सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांचे काही फोटो दाखवले होते. या फोटोमध्ये रुपाली चाकणकरांच्या हाताच्या अनामिकावर सफेद कापड गुंढाळल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. सुषमा अंधारेंच्या या आरोपांना रुपाली चाकणकर यांनी कालच्या पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. (Maharashtra Politics news)
Rupali Chakankar: रुपाली चाकणकरांनी तंत्रमंत्राच्या आरोपांबाबत काय सांगितलं?
काहीजणांनी पत्रकार परिषद घेऊन सातत्याने चुकीच्या बातम्या पसरवण्याचा प्रयत्न केला. कोणीतरी आज सांगितलं, 2 सप्टेंबरचा फोटो आहे. माझा हा फोटो 12 सप्टेंबरचा आहे. त्या फोटोवरील 1 अंक खोडून 2 सप्टेंबर तारीख दाखवली. त्यादिवशी अमावस्या-पोर्णिमा आहे, असे चुकीचे सांगितले. माझ्या अकाऊंटवर आजही गेलात तरी हे फोटो आहेत, ते 2 सप्टेंबरचे नाही, तर 12 सप्टेंबरचे आहेत. 2 सप्टेंबरला मी आदरणीय अजितदादांच्या दौऱ्यात होते. तेव्हा माझ्या हाताला कुठेही जखम नाही. 3 सप्टेंबर आणि 4 सप्टेंबरलाही मी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये होती, माझ्या हाताला कुठेही जखम नाही. 5 सप्टेंबरलाही माझ्या हाताला कुठेही जखम नाही. कुठला दिवस होता, कोणता विधी होता, माहिती नाही,कोणतीही जखम नाही. कायद्याच्या चौकटीतून आम्ही या सगळ्यांना नोटिसा पाठवू. बदनामी करणे, अश्लील टिप्पणी करणे, खोटे नरेटिव्ह सेट करणे, या सगळ्यांबाबत आम्ही कायद्याच्या माध्यमातून मी प्रक्रिया नक्की करेन.
मी परत सांगते, अशोक खरात दोषी आहे, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. आपल्याला कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत माहिती असण्याचे कोणतेही कारण नाही. आज आपण ज्यांच्यासोबत आहोत, ते चार-पाच वर्षांनी काय करणार आहे, याची कल्पना आपल्याला नसते. या सगळ्याचा निष्पक्ष तपास व्हावा. त्याच्यामुळे मी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माझ्या नेत्या सुनेत्रा वहिनींकडे सुपूर्द केला आहे. याबाबतचा निर्णय आदरणीय वहिनी घेतील, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
Sushma Andhare: सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
अनामिका का कापतात?, हे मला माहिती नव्हतं. त्याबाबतची माहिती शोधली. त्यावेळी मला धक्कादायक कारण समजली. तंत्र-मंत्र विद्येत हाताची अनामिका (Ring Finger) अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण ती सूर्य आणि शुक्र ग्रहाशी संबंधित असून ऊर्जा वहनाचे मुख्य केंद्र आहे. या बोटाचा वापर मुख्यत्वे मंत्रांचा प्रभाव वाढवण्यासाठी, विशिष्ट मुद्रा करण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी केला जातो. या बोटाद्वारे ऊर्जा शरीरात प्रवाहित किंवा शोषली जाऊ शकते. अनामिकेचे महत्त्वः ही बोट सूर्य (यश) आणि शुक्र (आकर्षण) यांच्याशी जोडलेली आहे, ज्यामुळे ती मंत्रोच्चाराद्वारे ऊर्जा प्रवाहित करण्याचे साधन बनते.
सोमवती अमावस्येला हा विधी करतात. 12 सप्टेंबर 2024 च्या फोटोमध्ये रुपाली चाकणकरांच्या हाताला मोठं बँडेज दिसत आहे. 9 सप्टेंबरच्या फोटोतही त्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांच्या हाताला बँडेज दिसत आहे. या सगळ्याचा शोध घेतल्यावर कळालं की, 2 सप्टेंबर 2024 ला सोमवती अमावस्या होती, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.