घड्याळ किंवा तुतारी एकच चिन्ह असतं तर फायदा झाला असता, रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या?

पुणे निवडणूक निकाल 2026 : निवडणुका म्हटलं की हार जीत होत असतेच. आम्ही या निकालानंतर आत्मचिंतन करू. जो कौल पुणे आणि पिंपरी चिंचवडकर यांनी दिला आहे तो कौल आम्ही स्वीकारला आहे. असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी पुणे निकालावर भाष्य करत अभिप्राय दिली आहे. पुण्यात अजित पवारांनी मोफत मेट्रो आणि बससेवा देण्याची घोषणा केली होती, त्या पुण्यात अजित पवारांना केवळ 27 जागा जिंकता आल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेतही अजित पवारांना मोठं अपयश पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आल्याचं दिसून आलाय. याच निकालावर भाष्य करत रुपाली चाकणकर यांनी अभिप्राय दिली आहे.

जनतेने जो कौल दिला आहे तो आपण स्वीकारला आहे. आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं मला वाटतं. हार जीत खुल्या मनाने मान्य करणे महत्त्वाचं आहे. पक्ष याबाबत नक्की विचार करेल. लोकशाही प्रक्रिया करावी. पुणेकर सुज्ञ पुणेकर आहेत, आम्ही निकाल मान्य केला आहे.

पुणे महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या उमेदवार रूपाली ठोंबरे पाटील यांनी मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ घातल्याची घटना घडली. मतमोजणी केंद्रात प्रवेश मिळावा म्हणून त्यांनी थेट जाळीवर चढून आत उडी मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणावर बोलताना रुपाली चाकणकर म्हणाला तेशेवटी आपण सगळे न्यायदेवतेवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. संविधान मानणारे लोक आहोत. असं काही घडलं असेल तर न्यायालयात जाऊन दाद मागावी. रूपाली ठोंबरे यांनी प्रचारात एनर्जी द्यायला हवी होती का या प्रश्नावर चाकणकरांni उत्तर द्या दिलं आहे. दरम्यानईव्हीएम बाबत आक्षेप बाबत कुठलीही तक्रार आली नाही. पण काही ठिकाणी शाही पुसण्यात आली होती, असा प्रकार समोर आला आहे. असेही त्या म्हणाल्या.

Rupali Chakankar : घड्याळ किंवा तुतारी एकच चिन्ह असतं तर फायदा झाला असता

पुण्यासह राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा झटका बसला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही मोठा पराभव झाल्याने दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी वाढला असून नुकतेच जाहीर झालेल्या झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणनीती आखली जात आहे. विशेष म्हणजे, आता झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर एकमत झाल्याची माहिती आहे.

Rupali Chakankar : जिल्हा परिषदेत एकच चिन्ह घेऊन लढले तर….

यावर बोलताना रुपाली चाकणकर म्हणाला तेमी आपल्याच माध्यमातून ही चर्चा ऐकत आहे. बारामतीमध्ये सगळे एकत्रित आले होते, त्यावेळी शशिकांत शिंदे यांनी याबाबत व्यक्तव्य केल आहे. अजित दादाही आपल्याशी बोलतील. ज्या चुका चिन्हाबाबत महानगरपालिकेच्या निवडणुकीत झाल्या आहेत त्या टाळण्याबाबत विचार होईल. चिन्हाबाबत चर्चा सुरू आहे. पुन्हा एक असेल तर फायदा होईलच. मतदारांचा गोंधळ उडणार नाही. महापालिकेत अनेक मतदारांचा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. घड्याळ किंवा तुतारी एकच चिन्ह असतं तर फायदा झाला असता. चिन्हामुळे नागरिकांचा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. जिल्हा परिषदेत एकच चिन्ह घेऊन लढले तर त्याचा फायदा होईल, असा विश्वासही रुपाली चाकणकरांनी बोलताना व्यक्त केलाहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.