राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर जुंपली

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फलटणमधील मृत महिला डॉक्टर संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. त्यातच, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे यांनी पीडित महिलेच्या कुटुंबियांची भेट थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून दिला. त्यावेळी, पीडित कुटुंबियांनी रुपाली चाकणकर यांच्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून, रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. 

रुपाली चाकणकर यांनी आपल्यावरील याच राजकीय डावाचा बदला घेण्यासाठी माधवी खंडाळकर यांना एक व्हिडिओ करायला लावला. याच रुपाली चाकणकर महिलांना धमक्या देतात, असा आरोप रुपाली ठोंबरे यांनी केला आहे. माधवी मंदार खंडाळकर या महिलेने रुपाली ठोंबरे यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला. त्यानंतर, माधवी यांनी माघार घेतली मात्र या निमित्ताने रुपाली ठोंबरे आणि रूपाली चाकणकर यांच्यातला वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी माधवी खंडाळकर यांना असा व्हिडिओ करण्यासाठी प्रवृत्त केल असा हल्लाबोल रुपाली ठोंबरे यांनी चाकणकरांवर केला आहे. यापूर्वी देखील चाकणकरांनी अनेक महिलांना धमक्या दिल्या आणि असे वीडियो तयार करायला लावले आहेत असाही आरोप केला आहे. एवढच असेल तर ग्राऊंडवर कामानिशी लढा अस थेट आव्हान रुपाली ठोंबरे यांनी चाकणकरांना दिल आहे

Comments are closed.