मिस्टर रोहित पवार, सुनेत्रा पवारांच्या बैठकीवर टीका करताच राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरे संताप
रोहित पवार वर रुपाली पाटील थॉम्ब्रे: राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar) यांनी दिल्लीत भाजपा खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) यांच्या निवासस्थानी राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला उपस्थिती लावल्यावरून चांगलंच राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीवरुन त्यांच्यावर टीका करणाऱ्या आमदार रोहित पवारांना राष्ट्रवादीचे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी चांगलं सुनावलं आहे. सुनेत्रा पवार राणौत यांच्या घरी सदिच्छा भेटीसाठी गेल्या होत्या. तिथे कुणाची बैठक होती हे त्यांना माहीत नव्हतं. मात्र, राष्ट्रवादीची कावीळ झालेल्या रोहित पवारांना सर्वच पिवळं दिसत असल्याचा टोला ठोंबरे यांनी लगावला.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
अजित पवार सत्तेत गेल्याची त्यांची कारणे वेगळी आहेत. पण तिथं गेल्यावर त्यांनी भाजपचे विचार स्वीकारले नसतील, म्हणून कदाचित त्यांच्यावर प्रेशर असेल. एखाद्या बैठकीला, कुठतरी एखादा फोटो येऊ द्या, म्हणजे संदेश जातो की हे सु्द्धा आता आरएसएसचे विचार स्वीकारायला लागले आहेत. एका बाजुला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेता आणि दुसरीकडे आरएसएसच्या बैठकीला जात असाल, तर ही दुटप्पी भूमिका आहे , अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या कंगना रणौत यांच्या घरी भेट दिल्यानंतर टीका केली होती.
खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला हजेरी
खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला हजेरी लावली. महायुतीमध्ये असूनही अजित पवार संघाच्या बैठकांना उपस्थित राहत नाहीत. मात्र त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला उपस्थिती लावल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज्य विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनावेळी महायुतीच्या सर्व सांसदांना हेडगेवार स्मारक येथे बौद्धिकाचे आमंत्रण असते. परंतु, अजित पवार आणि त्यांचे आमदार तिथे जात नाहीत. त्याचप्रमाणे दिल्लीतही अधिवेशनाच्या वेळी संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला अजित पवारांच्या पत्नी उपस्थित राहिल्या. भाजप खासदार कंगना राणौत यांनी या बैठकीचा फोटो ट्वीट केला आहे. या फोटोमध्ये सुनेत्रा पवार यांच्या मागे भारतमातेच्या फोटोसह डॉक्टर हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींचाही फोटो दिसत आहे. ही उपस्थिती राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे.
https://www.youtube.com/watch?v=b2fwiqxwvwm
महत्वाच्या बातम्या:
Sunetra Pawar RSS Meeting | सुनेत्रा पवार यांची राष्ट्रसेविका समिती बैठकीला हजेरी, राजकीय चर्चांना उधाण!
आणखी वाचा
Comments are closed.