युक्रेनची राजधानी कीववर रशियाच्या ड्रोन हल्ला; ३ जणांचा मृत्यू, २९ जण जखमी

रशिया-युक्रेन-युद्ध

रशियाने युक्रेनची राजधानी कीववर ड्रोन हल्ला केला. यामध्ये तीन जणांचा मृत्यू असून २९ जण जखमी झाले. जखमींमध्ये सात मुलांचा समावेश आहे. याबाबत माहिती देताना युक्रेनचे गृहमंत्री इगोर क्लिमेन्को म्हणाले की, या हल्ल्यात १९ वर्षीय तरुणी आणि तिची ४६ वर्षीय आई देखील ठार झाली. रशियाने थेट नागरिकांना लक्ष्य केले आहे, अशा हल्ल्यांची ही सलग दुसरी रात्र होती.

युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, रशियाने १०१ ड्रोन हल्ले केले. त्यापैकी ९० हल्ले त्यांनी हाणून पाडले. याआधी शनिवारी रशियाच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यांनंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युरोपियन देशांना हवाई संरक्षण मदतीची विनंती केली आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने दावा केला आहे की, त्यांच्या सैन्याने ऊर्जा सुविधा, रेल्वे पायाभूत सुविधा आणि इतर लष्करी ठिकाणांवर हल्ला केला.

Comments are closed.