रशियाचा युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला, 14 जणांचा मृत्यू; 48 जण जखमी

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबतच नाही आहे. गेल्या चार वर्षांपासून दोन देशात सुरू असून कोणताही देश मागे हटण्यास तयार नाही. आता रशियाने युक्रेनची राजधानी कीवमधील युरोपियन युनियन प्रतिनिधी भवनावर हल्ला केला आहे. यात 14 जणांचा मृत्यू झाला असून 48 जण जखमी झाले आहेत.
युक्रेनच्या म्हणण्यानुसार रशियासोबत सुरू असलेल्या संघर्षादरम्यान हा आतापर्यंतचा दुसरा सर्वात मोठा हल्ला आहे. या हल्ल्यात तीन बालकांसह 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच युरोपियन युनियनच्या इमारतीसह अनेक सेवांचे नुकसान झाले आहे.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एक्स वर पोस्ट करत दावा केला की, युक्रेनवर एकाच रात्रीत 629 क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागले गेले. ही रशियाची शांतीची संकल्पना आहे, दहशतवाद आणि तोडफोड. निवासी परिसर आणि नागरी पायाभूत सुविधांना जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आले.
Comments are closed.