तेलखरेदीसाठी रशियाकडून हिंदुस्थानला ऑफर

अमेरिकेने हिंदुस्थानवर तेल खरेदीसाठी तब्बल 50 टक्के टॅरिफ लावल्याने रशियाने हिंदुस्थानला तेल खरेदीची ऑफर दिली आहे. यामध्ये रशियाने हिंदुस्थानला ब्रेंट क्रूडच्या लोडिंगवर प्रति बॅरल 2 डॉलर ते 2.50 डॉलरपर्यंतची सूट देण्याची ऑफर दिली आहे. हिंदुस्थानने ही ऑफर स्वीकारल्यास अमेरिकेने लादलेल्या डबल टॅरिफचा परिणाम जाणवणार नाही. जुलै आणि ऑगस्टमध्ये रशियाकडून दिली जाणारी सवलत प्रति बॅरल 1 डॉलर होती. हिंदुस्थान रशियाकडून तेल खरेदी करून युक्रेनविरोधातील युद्धासाठी त्यांना आर्थिक पाठबळ देत आहे असा आरोप करत ही तेलखरेदी बंद करण्यासाठी अमेरिका दबाव टाकत आहे.

Comments are closed.