रशिया भूकंपाने हादरले, त्सुनामीचा इशारा

रशियामध्ये मोठा भूकंप झाला असून, या भूकंपाची तीव्रता ही ७.८ रिश्टर स्केल इतकी होती. यामुळेच आता रशियामध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. कामचटका बेटाजवळ हा भूकंप जाणवला असून, या जोरदार भूकंपामुळे लोक घाबरले. भूकंपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. एका आठवड्यापूर्वी रशियामध्ये तीव्र भूकंपाचा धक्का जाणवला होता. त्याचवेळी कामचटका प्रदेशाजवळ ७.४ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला.
कामचटका प्रदेशाचे गव्हर्नर व्लादिमीर सोलोडोव्ह यांनी टेलिग्रामवर घोषणा केली की, पूर्व किनाऱ्यावर त्सुनामीचा धोका निर्माण झाला आहे. त्यांनी सांगितले की स्थानिकांना सतर्क करण्यात आले आहे. रशियातील कामचटका येथे यापूर्वीही भूकंप झाले आहेत. शनिवारी (१३ सप्टेंबर) ७.४ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला, ज्यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला. यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, कामचटका प्रदेशाचे प्रशासकीय केंद्र असलेल्या रशियन शहर पेट्रोपाव्लोव्स्क-कामचटस्कीपासून १११ किलोमीटर (६९ मैल) पूर्वेला ३९.५ किलोमीटर खोलीवर भूकंप झाला.
रशियातील कामचटका हा भूकंपप्रवण प्रदेश आहे. या महिन्यात (सप्टेंबर २०२५) एकूण तीन भूकंप झाले आहेत. १५ सप्टेंबर रोजी कामचटका येथे ६.० रिश्टर स्केलचा भूकंप झाला, त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. जुलैमध्येही अनेक भूकंप झाले, ३० जुलै रोजी ८.८ रिश्टर स्केलचा भूकंप आणि २० जुलै रोजी ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला.
Comments are closed.