रायपूरमध्ये ऋतु’राज’! दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर तुटून पडला, कारकिर्दीतील पहिले तडाखेबाज शत
रुतुराज गायकवाड सेंच्युरी इंड विरुद्ध सा दुसरी वनडे : रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या वनडे सामना खेळला जात आहे. या सामन्यात ऋतुराज गायकवाडने आपल्या कारकिर्दीतील पहिले वनडे शतक ठोकत जोरदार पुनरागमन केलं. भारतीय संघाची परिस्थिती 2 बाद 62 अशी बिकट होती, तेव्हा चौथ्या क्रमांकावर ऋतुराजला मैदानात उतरावं लागलं.
रुतुराज गायकवाडने पहिले एकदिवसीय शतक झळकावले#INDvSA 📝: https://t.co/b4ectUVL0T pic.twitter.com/qS20xRalhr
— ICC (@ICC) ३ डिसेंबर २०२५
ऋतुराजने ठोकले कारकिर्दीतील पहिले तडाखेबाज शतक
ऋतुराज गायकवाडने रायपूर वनडेमध्ये शानदार शतक झळकावले. गायकवाडचे हे पहिले वनडे शतक आहे. गायकवाड जेव्हा क्रीजवर आला तेव्हा संघ अडचणीत होता. रोहित आणि जैस्वाल बाद झाले होते, परंतु त्यानंतर गायकवाडने विराट कोहलीसोबत उल्लेखनीय भागीदारी केली. गायकवाड पहिल्याच चेंडूवर आऊट होण्यापासून थोडक्यात बचावला, परंतु त्यानंतर त्याने काही उत्कृष्ट शॉट्स खेळले आणि फक्त 52 चेंडूत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने पुढील 25 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. गायकवाडने फक्त 77 चेंडूत त्याचे पहिले वनडे शतक पूर्ण केले.
पहिले वनडे शतक! 💯🥳
रुतुराज गायकवाड यांची खास खेळी! 🔥
अपडेट्स ▶️ https://t.co/oBs0Ns6SqR#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/cnIhlR5JgE
— BCCI (@BCCI) ३ डिसेंबर २०२५
ट्रोलिंग आणि नेत्रदीपक पुनरागमन (ऋतुराज गायकवाड कारकिर्दीतील पहिले शतक)
ऋतुराज गायकवाडसाठी मालिकेची सुरुवात निराशाजनक होती. रांची येथील पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो पूर्णपणे अपयशी ठरला, त्याने 14 चेंडूत फक्त 8 धावा केल्या. या खराब कामगिरीमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग झाले. पण, ऋतुराजने या सर्व टीकेला झुगारून दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात उल्लेखनीय पुनरागमन केले. त्याने एक ऐतिहासिक खेळी खेळली, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध संयम आणि आक्रमकतेचे परिपूर्ण मिश्रण दाखवत पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केले.
पहिल्याच एकदिवसीय शतकाची अनुभूती! 💯😎
रुतुराज गायकवाड ची रायपूर मध्ये धमाकेदार खेळी 🙌
अपडेट्स ▶️ https://t.co/oBs0Ns6SqR#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank | @Ruutu1331 pic.twitter.com/8xvlsKyjDr
— BCCI (@BCCI) ३ डिसेंबर २०२५
105 धावा काढून ऋतुराज गायकवाड बाद
जानसेनने ऋतुराज गायकवाडला आऊट केले. तो 83 चेंडूत 12 चौकार आणि दोन षटकारांसह 105 धावा काढून बाद झाला. ऋतुराज आणि कोहलीने 156 चेंडूत तिसऱ्या विकेटसाठी 195 धावा केल्या. राहुल आता मैदानात उतरला आहे. कोहली 96 धावा करत खेळत होता.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.