रशियन तेलाचे सर्वात मोठे खरेदीदार आम्ही नव्हे, चीन, जयशंकर यांची पुतिन यांच्या समोरच ट्रम्प यांच्यावर टीका

रशियन तेलाचे मोठे खरेदीदार आम्ही नाही तर चीन आहे, तर रशियन एलएनजीचे सर्वात मोठे खरेदीदारही युरोपियन महासंघ आहे, अशा शब्दांत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सुनावले. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो म्हणून हिंदुस्थानवर अमेरिकेने लादलेल्या अतिरिक्त 25 टक्के टॅरिफवरून जयशंकर यांनी आज मॉस्को येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासमोरच ट्रम्प यांच्यावर टीका केली. '

अमेरिकेनेच जगातील तेल बाजारपेठ स्थिर राखण्यासाठी रशियाकडून तेल खरेदी करण्यासह आपण सर्व पावले उचलली पाहिजेत, असेही जयशंकर म्हणाले. 2022 नंतर रशियासोबत सर्वात जास्त व्यापार वाढवणारा देशही आम्ही नसून ते दक्षिणेकडचे काही देश आहेत. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकन लोक म्हणत आहेत की, आपण जगातील तेल बाजारपेठा स्थिर करण्यासाठी सर्वकाही केले पाहिजे. ज्यात रशियाकडून तेल खरेदी करण्याचाही समावेश आहे. आम्ही अमेरिकेकडूनही तेल खरेदी करतो. तसेच ही तेलखरेदीही आता वाढत आहे, असेही जयशंकर यांनी नमूद केले.

अमेरिकेचा दबाव झुगारला

हिंदुस्थानने अमेरिकेचा दबाव झुगारून रशियाशी व्यापार संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सध्या रशियाच्या दौऱयावर आहेत. व्यापार आणि आर्थिक सहकार्याच्या बाबतीत झालेल्या बैठकीत हिंदुस्थान आणि रशियाने संतुलित आणि व्यापार सातत्य ठेवण्याची इच्छा व्यक्त केल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे.

Comments are closed.