SA vs NZ; आफ्रिकेला दुसरा एबी डिव्हिलियर्स मिळाला! पठ्ठ्याचे पदार्पणातच विश्वविक्रमी शतक

दक्षिण आफ्रिकेचा युवा सलामीवीर मॅथ्यू ब्रिट्झकेने न्यूझीलंडविरुद्धच्या पदार्पणातच इतिहास रचला. त्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना धुडकावून लावत 150 धावा केल्या. तो त्याच्या पदार्पणाच्या एकदिवसीय सामन्यात 150 धावा करणारा जगातील पहिला फलंदाज बनला आहे. 26 वर्षीय फलंदाजाने त्याचा निवृत्त संघातील वरिष्ठ खेळाडू एबी डिव्हिलियर्सच्या शैलीत चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. ही तिरंगी मालिका पाकिस्तानच्या यजमानपदाखाली खेळली जात आहे. या सामन्यात किवी गोलंदाज त्याच्या धोकादायक फलंदाजीसमोर प्रचंड दबावाखाली असल्याचे दिसून आले.

मॅथ्यू ब्रीट्झके हा एकदिवसीय पदार्पणात शतक करणारा चौथा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज ठरला. त्याच्या आधी, कॉलिन इंग्रामने हा पराक्रम केला होता ज्याने 2010 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 124 धावा केल्या होत्या, तर सध्याचा कर्णधार टेम्बा बावुमाने 2016 मध्ये आयर्लंडविरुद्ध 113 धावांची खेळी केली होती. 2018 मध्ये रीझा हेंड्रिक्सने श्रीलंकेविरुद्ध 102 धावा केल्या होत्या.

लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर मॅथ्यू ब्रिट्झकेने कर्णधार टेम्बासोबत सलामीची जबाबदारी घेतली. एका टोकावरून विकेट पडत राहिल्या, पण मॅथ्यू ब्रिट्झकेने धावा वाढवणे थांबवले नाही. तो दुसऱ्या टोकाला बॅट फिरवत राहिला. जे. स्मिथने 41 आणि मुल्डरने 64 धावा करत त्याला साथ दिली, तर मॅथ्यू ब्रीट्झकेने कहर करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. तो पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे.

Comments are closed.