दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर विजय

न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील लढतीत न्यूझीलंडकडून झालेल्या पराभवाचा वचपा काढला आहे. पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडला  7 विकेटनं पराभूत केलं. न्यूझीलंडची फलंदाजी या सामन्यात देखील गडगडली.न्यूझीलंडचा पूर्ण संघ केवळ 91 धावांवर बाद झाला.  तर, दक्षिण आफ्रिकेनं 3 विकेट गमावून 17 व्या ओव्हरमध्ये विजय मिळवला.

न्यूझीलंडनं दक्षिण आफ्रिकेला टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत 9 विकेटनं पराभूत केलं होतं. यामुळं दक्षिण आफ्रिकेचा टी 20 वर्ल्ड कपमधील प्रवास संपला होता. दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपमधील पराभवाचा वचपा काढला आहे. न्यूझीलंडवर दक्षिण आफ्रिकेनं पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या टी 20 सामन्यात 7 विकेटनं विजय मिळवला आहे. घरच्या मैदानावर सामना होत असून देखील न्यूझीलंडची कामगिरी खराब झाली.

मॅचमध्ये काय घडलं?

न्यूझीलंडनं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडच्या फलंदाजांची कामगिरी खराब राहिली.  14.3 ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा संघ 91 धावांवर बाद झाला. जेम्स नीशम यानं 21 बॉलमध्ये 2 चौकार आणि 1 षटकार मारत 26  धावांची खेळी केली. नीशम ऐवजी दुसरा फलंदाज  20 धावांचा टप्पा पार करु शकला नाही. संघातील  7 फलंदाजांना 10 धावांचा टप्पा पार करता आला नाही.

दक्षिण आफ्रिकेतील नकोबानी मोकोएना यानं  3  विकेट घेतल्या. गेराल्ड कोएत्जी, ओटनेल बार्टमेन आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या.

आफ्रिकेचा सहज विजय

दक्षिण आफ्रिकेच्या संघानं न्यूझीलंडला  7 विकेटनं पराभूत केलं आहे. दक्षिण आफ्रिकेनं  91 धावांचं आव्हान पार करताना 3 विकेट गमावल्या. कॉर्नर एस्टरहुइजेन यानं  48 बॉलमध्ये 2 चौकार आणि  2 षटकारांच्या जोरावर नाबाद 45 धावा केल्या. मात्र, दक्षिण आफ्रिकेचे इतर फलंदाज देखील  20 धावांचा टप्पा पार करु शकले नाहीत.

न्यूझीलंडच्या काइल जेमीसन, जेकरी फाउल्क्स आणि मिशेल सँटनर यांनी 1-1 विकेट घेतली. जेमीसन सर्वात महागडा गोलंदाज ठरला. ज्यानं  3.4 ओव्हरमध्ये  28 धावा केल्या. त्याची इकोनॉमी 7.60 राहिली.

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत सामना झाला होता. दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपमध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र, उपांत्य फेरीत न्यूझीलंडनं त्यांच्यावर 9 विकेटनं विजय मिळवला होता. अंतिम लढतीत मात्र, न्यूझीलंडचा भारतानं 96 धावांनी पराभव करत विजेतेपद मिळवलं होतं. न्यूझीलंडचा संघ त्या पराभवातून सावरला नसल्याचं चित्र आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.