आधी अंगावर धावून गेले मग… मैदानात घेरलं; पाकिस्तानी खेळाडूंनी टेम्बा बावुमासोबत नेमकं काय केल

पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय: पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिरंगी मालिकेचा सामना 12 फेब्रुवारी रोजी कराचीतील नॅशनल स्टेडियमवर खेळवण्यात आला. ज्यामध्ये पाकिस्तानी संघाने हा सामना 6 विकेट्सने जिंकला आणि अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. या सामन्यादरम्यान पाकिस्तानी संघाच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षण करताना खूप वाईट वर्तन केले, ज्यामुळे मैदानावरील पंचांना सामन्याच्या मध्यभागी पाकिस्तानी संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवानला ( Mohammad Rizwan) इशारा द्यावा लागला. पाकिस्तानी संघाचा खेळाडू सौद शकीलने (Saud Shakeel) आफ्रिकन संघाचा कर्णधार टेम्बा बावुमाला (Temba Bavuma) आऊट केल्यानंतर हे कृत्य घडले.

ड्रेसिंग रूममध्ये जाताना टेम्बा बावुमा पाकिस्तानी खेळाडूंनी घेरलं…

कराचीतील नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिरंगी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये त्यांच्याकडून शानदार फलंदाजी दिसून आली. आफ्रिकेचा कर्णधार बावुमानेही 82 धावांची खेळी खेळली, पण तो धावबाद झाला. खरंतर, बावुमाने पॉइंटच्या दिशेने एक हलका शॉट खेळून धाव घेण्याचा प्रयत्न केला, पण नॉन-स्ट्राइकवर उभ्या असलेल्या फलंदाजाने धाव घेण्यास नकार दिला. यानंतर, बावुमा पुन्हा क्रीजवर पोहोचण्यापूर्वीच पाकिस्तानी क्षेत्ररक्षक सौद शकीलने त्याला धावबाद केले. यानंतर सौद आक्रमक दिसला आणि त्याने आनंद व्यक्त करण्यासाठी बावुमाकडे पळत सुटला, दुसरीकडून अजून दोन-तीन खेळाडू आले आणि टेम्बा बावुमा घेरलं.

टेम्बा बावुमासोबत झालेल्या अशा कृत्यानंतर मैदानी पंचांनाही हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनी पाकिस्तानी संघाचा कर्णधार मोहम्मद रिझवानला बोलावून त्याच्याशी घटनेबद्दल बोलले. या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, पाकिस्तानी संघाने 49 षटकांत 353 धावांचे लक्ष्य गाठले आणि अंतिम सामन्यात आपले स्थान निश्चित केले, जिथे आता त्यांचा सामना 14 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडशी (Pakistan vs New Zealand ODI) होईल. किवी संघाने लीग टप्प्यात पाकिस्तानी संघाला 78 धावांनी पराभूत केले होते.

हे ही वाचा –

Pakistan : पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताला पुन्हा हरवणार? 353 चा स्कोअर केला चेस अन् मोडले सर्व रेकॉर्ड; टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

अधिक पाहा..

Comments are closed.