'एमआय केपटाऊन'चा सनसनाटी विजय, SA20 ट्रॉफी उंचावत इतिहास रचला!
SA20 लीग 2025 च्या अंतिम सामन्यात एमआय केपटाऊनने सनरायझर्स इस्टर्न केपचा 76 धावांनी पराभव करत पहिल्या विजेतेपदावर मोहोर उमटवली. जोहान्सबर्गच्या वाँडरर्स स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात एमआय केपटाऊनने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 बाद 181 धावा केल्या. ज्यामध्ये डेवाल्ड ब्रेविस (38), कॉनर एस्टरहुईझन (39), आणि रायन रिकेल्टन (33) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. पण सनरायझर्स इस्टर्न केपने या सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. त्यांच्या फलंदाजांना भागीदारी करण्यास अपयश आले, त्यामुळे एमआय केपटाऊनने सहज विजय मिळवला.
सनरायझर्स इस्टर्न केपने प्रत्युत्तरात खराब सुरुवात केली आणि त्यांचे प्रमुख फलंदाज लवकर बाद झाले. त्यांचा संपूर्ण संघ 18.3 षटकांत केवळ 105 धावांवर गारद झाला. एमआय केपटाऊनच्या भेदक गोलंदाजीसमोर त्यांचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. ज्यात कागिसो रबाडाने 4 बळी घेतले, तर ट्रेंट बोल्ट आणि जॉर्ज लिंडे यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले.
या विजयासह एमआय केपटाऊनने SA20 चॅम्पियनशिपवर आपले नाव कोरले. कर्णधार रशिद खानच्या नेतृत्वाखाली संघाने पहिल्यांदाच SA20 चा किताब जिंकला. ट्रेंट बोल्टला सामन्याचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. ज्याने 4 षटकात केवळ 9 धावा देत 1 विकेट्स घेतल्या. तर स्पर्धेचा मालिकावीरचा पुरस्कर सनरायर्झसचा अष्टपैलू मार्को जान्सनने जिंकली. त्याने संपूर्ण स्पर्धेत 19 विकेट्स घेतल्या तर फलंदाजीतही त्याने 204 धावा केल्या.
Mi फ्रँचायझी इतिहासातील 11 व्या टी 20 शीर्षक 🚨 pic.twitter.com/xklfnx2wia
– जॉन्स. (@Criccrazyjhons) 8 फेब्रुवारी, 2025
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्राॅफीपू्र्वी संघाला मोठा धक्का, स्टार वेगवान गोलंदाज बाहेर
चॅम्पियन्स ट्राॅफी जिंकण्यापेक्षा भारताला हरवणे महत्वाचे, पहा काय म्हणाले पाकिस्तानचे PM?
IND vs ENG; दुसऱ्या वनडेत श्रेयस अय्यरला भारतीय संघात स्थान मिळणार का?
Comments are closed.