साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 19 ऑक्टोबर 2025 ते शनिवार 25 ऑक्टोबर 2025

>> नीलिमा प्रधान

जाळी – सौम्य धोरण ठेवा

मेषेच्या अष्टमेषात बुध, सूर्य शनि षडाष्टक योग. कोणतेही काम करताना घाई, निष्काळजीपणा करू नका. सौम्य धोरण ठेवा. शारीरिक, मानसिक दडपण येईल. नोकरीत धावपळ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तणाव, गैरसमज होतील. शुभ दिवस. 21, 22

वृषभ – ताण वाढवू नका

वृषभेच्या सप्तमेषात बुध, चंद्र गुरू त्रिकोणयोग. वागण्या, बोलण्यात सहजता ठेवा. कोणतीही समस्या संपवण्याचा प्रयत्न करा. ताण वाढवू नका. नोकरीत अपमानकारक घटना घडतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अहंकार दूर ठेवा. शुभ दिवस. 20, 24

मिथुन – गैरसमज होतील

मिथुनेच्या षष्ठेशात बुध, चंद्र शुक्र युती. दीपावली छान साजरी करा. इतरांचे खोचक बोलणे मनावर न घेता कामे करा. नोकरीत कौतुकाची अपेक्षा इsऊ नका. नात्यात, मैत्रीत गैरसमज होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चालना मिळेल. शुभ दिवस. 21, 22

कर्करोग – वाद मिटवता येईल

कर्केच्या पंचमेषात बुध, चंद्र शुक्र लाभयोग. दीपावली उत्साह वाढवणारी. जुना वाद मिटवता येईल. नोकरीत दगदग होईल. धंद्यात हिशेब तपासा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचा प्रश्न रेंगाळत ठेवू नका. नम्रता सोडू नका. शुभ दिवस. 20, 21

सिंह – मन अस्थिर होईल

सिंहेच्या सुखस्थानात बुध, चंद्र मंगळ युती. कोणतीही कामे करताना स्वतची काळजी घ्या. क्षुल्लक चूक महाग पडेल. जुन्या आठवणांनी मन अस्थिर होईल. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दूरदृष्टिकोन ठेवा. शुभ दिवस. 21, 23

कन्या – फायदेशीर कार्यक्रम

कन्येच्या पराक्रमात बुध, चंद्र गुरू त्रिकोणयोग. प्रत्येक दिवस दीपावलीचा आनंद घेता येईल. कोणतीही कठीण समस्या सोडवता येईल. नोकरीत लाभदायक घटना घडतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचा डंका वाजेल. शुभ दिवस. 21, 22

तूळ – कामामध्ये सावध रहा

तुळेच्या धनेषात बुध, चंद्र मंगळ युती. दीपावलीच्या तेजाने आसमंत उजळेल. कामामध्ये सावधगिरी ठेवा. कठोर शब्द नको. नोकरीधंद्यात बदल होतील. भावनेच्या आहारी जाऊ नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्व वाढेल. शुभ दिवस. 22, 23

वृश्चिक – संयम बाळगा

स्वराशीत बुध, बुध गुरू त्रिकोणयेग. दीपावलीच्या सुरुवातीला मन अस्थिर होईल. संमय बाळगा. कोणत्याही प्रश्नावर योग्य उत्तर शोधा. वाहन जपून चालवा. सहनशीलता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधक टीका करतील. शुभ दिवस. 20, 21

धनु – आत्मविश्वास वाढेल

धनुच्या व्ययेषात बुध, चंद्र गुरू युती. दीपावली प्रथेनुसार साजरी करा. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. इतरांच्या बोलण्याचा फार विचार करू नका. सौम्य धोरण ठेवा. धंद्यात लाभ कमवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सन्मान मिळेल. शुभ दिवस. 20, 21

मकर – प्रत्येक दिवस प्रगतीकारक

मकरेच्या एकदशात बुध, चंद्र शुक्र लाभयोग. दीपावलीचा सण प्रेरणा देणारा. राहून गेलेली कामे पूर्ण करा. नोकरीत स्थिरता वाढेल. प्रत्येक दिवस प्रगतीकारक ठरेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्यासोगत मैत्रीची भाषा होईल. शुभ दिवस. 20, 22

कुंभ – तारेसाठी तारतेन

कुंभेच्या दशमेषात बुध, चंद्र मंगळ. युती. दीपावली मनाला, कार्याला उभारी देणारी. क्षेत्र कोणतेही असो तारतम्य बाळगा. कोणतीही आग्रही भूमिका घेऊ नका. धंद्यात करार नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात काही व्यक्ती दगा देतील. शुभ दिवस. 21, 22

मीन – प्रवासात घाई नको

मीनेच्या भाग्येषात बुध, चंद्र गुरू त्रिकोणयोग. अरेरावी, अहंकार नको. दीपावली आनंदाची ठरेल. प्रगतीकारक बातमी मिळेल. प्रवासात घाई नको. नोकरीत सहनशीलता ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संमिश्र स्वरूपाचे वातावरण. शुभ दिवस. 20, 24

Comments are closed.