रोखठोक – ज्ञानेश कुमारचा जनादेश, बिहारात ‘बेइमानी’चा विजय!

बिहारात भाजप वगैरेचा विजय होऊनही विजयी जल्लोष दिसला नाही. महाराष्ट्रात भाजप जिंकूनही कुठे आनंदोत्सव दिसला नाही. कारण या निकालांवर कोणाचाच विश्वास नाही. हा ‘जनादेश’ नसून निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारचा जनादेश आहे, असे उघडपणे बोलले जाते. निवडणूक आयोगाची बेइमानी लोकशाहीचे थडगे खणत आहे.

बिहारच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. निकाल लागले. भाजप आणि नितीश कुमार यांच्या पक्षाला प्रचंड विजय मिळाला, पण संपूर्ण बिहारमध्ये या विजयाचा जल्लोष कोठेच दिसत नाही. महाराष्ट्रात असेच घडले. इतका मोठा विजय मिळवून जे सत्तेवर आले ते स्वत:च विजयाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. महाराष्ट्रातही कोठेही विजयी मिरवणुका, आनंदोत्सव साजरा झाल्याचे दिसले नव्हते. मग हा जनमताचा कौल कसा मानायचा? हा प्रश्न अनेकांना पडला. बिहारात विजयानंतरही सन्नाटा आहे. नितीश कुमार नावाचे पलटूराम दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. राम मनोहर लोहिया, जार्ज फर्नांडिस यांच्यापासून सुरू केलेला प्रवास त्यांनी मोदींच्या चरणापाशी येऊन थांबवला. बिहारच्या निकालाचे एका वाक्यात विश्लेषण कन्हैया कुमार यांनी केले. ते म्हणतात, “यह बिहार का जनादेश नहीं. ज्ञानेश कुमार का जनादेश है।” बिहारमध्ये कोणीच खूश नाही. विद्यार्थी रस्त्यावर उतरले. शिक्षक रस्त्यावर उतरले. गरीबांचा आवाज कोणी ऐकत नाही. मजूर परेशान आहे. शेतकरी, कष्टकरी, नोकरदार वर्ग, मध्यमवर्ग सगळेच बिहारच्या राज्यव्यवस्थेत संतप्त आहेत. मग या सरकारला मतदान केले कोणी? हा ज्ञानेश कुमार या निवडणूक आयुक

हायजॅक!

बिहारमधील निवडणुका ‘हायजाक’ केल्या. निवडणुका निष्पक्ष होणार नाहीत यावर सगळ्यांचेच एकमत होते. निवडणुकांवर बहिष्कार टाकणे व ’भाजपला हवा तो हैदोस घालू द्या’ हा एकमेव पर्याय होता व कधीतरी लोकशाहीच्या रक्षणासाठी निवडणुकांवर सगळ्यांनी बहिष्कार टाकून भारतातील हुकूमशाहीकडे जगाचे लक्ष वेधावे लागेल. बिहार आणि महाराष्ट्रातील निवडणुका निकालांतील काही काळे डाग दाखवणे गरजेचे आहे.

बिहारात तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलास सगळ्यात जास्त म्हणजे 23.07 टक्के मते मिळाली, पण त्यांना 25 जागा मिळाल्या. भाजपने 20.8 टक्के मते मिळून 89 जागा व जनता दल (यू) ने 19.85 टक्के मते मिळून 85 जागा जिंकल्या.

बिहारात एकूण मतदार 7.42 कोटी. मतदान केले 7.45 कोटी लोकांनी. निवडणूक आयोग म्हणतोय हे फक्त 66.67 टक्के मतदान आहे. म्हणजे बिहारात 12 कोटी मतदार आहेत?

निवडणुकीच्या आधी सरकारी पैशांनी महिलांची मते विकत घ्यायचा पायंडा सत्ताधाऱ्यांनी पडला आहे. मध्य प्रदेशात ‘लाडली बहना योजना’, महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण योजना’, झारखंडमध्ये ‘मैया सम्मान योजना’ आणि बिहारात ‘महिला रोजगार’ आणून निवडणुकीतच महिलांच्या खात्यावर दहा हजार रुपये जमा केले. साधारण दहा हजारांप्रमाणे सवा कोटी महिलांची मते मोदी यांनी विकत घेतली.

महाराष्ट्रात भाजपने 149 जागा लढून 132 जागा जिंकल्या. बिहारात भाजपने 101 जागा लढून 89 जागा जिंकल्या.

(महाराष्ट्रात संध्याकाळी 5 वाजल्यानंतर 65 लाख मतदान अचानक वाढले होते.)

बिहारात तेच चित्र आहे. हा भाजपचा, नितीश कुमारांचा विजय नाही. हा तेजस्वी यादव किंवा काँग्रेसचा पराभव नाही. बेइमान निवडणूक यंत्रणेचा विजय आहे. बिहारमध्ये 62 लाख मतदारांची नावे कापली व 20 लाख नवे मतदार जोडले. त्यातले पाच लाख मतदान एसआयआर फार्मशिवाय वाढवले. दलित, अल्पसंख्याक, गरीबांची मते निर्दयपणे कापण्यात आली. हे सर्व निवडणूक आयोगाच्या मदतीने केले. या निवडणूक यंत्रणेवर कसा विश्वास ठेवायचा?

शोकांतिका कोणाची?

भारतीय निवडणुका यापुढे निष्पक्ष होणार नाहीत ही खुणगाठ मनाशी बांधावी लागेल. ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सर्व निवडणुका भाजपला याच पद्धतीने जिंकायच्या आहेत व देशात विरोधी पक्ष शिल्लक ठेवणार नाही हे नरेंद्र मोदी आणि अमित शहांचे धोरण आहे. कालपर्यंत ज्यांना भ्रष्टाचारी, खुनी, दरोडेखोर ठरवले अशा सगळ्यांना भाजप आपल्या पक्षात घेत आहे. ही भारतीय लोकशाहीची शोकांतिका मानायला हवी. भारतात लोकशाहीचे थडगे बांधले जात आहे. बिहारच्या निकालाने त्या थडग्यावर पुष्पपा अर्पण करून लोकशाहीला आदरांजली अर्पण केली. भारताच्या उद्याच्या राजकारणाचे चित्र बिहारच्या निकालातून स्पष्ट झाले आहे. त्याचा विचार आपण सर्वांनीच करायला हवा.

तेजस्वीची मेहनत

बिहारचे प्रमुख नेते लालू प्रसाद यादव हे आजारी आहेत. त्यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी प्रचाराची धुरा सांभाळली व बिहारात भाजपविरोधी रान उठवले. बिहारातील निवडणूक भाजप व नितीश कुमारांना सोपी राहिलेली नाही असे वातावरण तेजस्वी यादव यांनी निर्माण केले. यादव, दलित, मुस्लिम हा तेजस्वी यादवांचा समर्थक वर्ग. तेजस्वी एकवेळ निवडणूक हरू शकतील, पण त्यांना फक्त 25-30 जागा मिळतील हे कुणाला मान्य होणार नाही. भाजपचा अश्वमेधाचा घोडा बिहारात रोखण्यासाठी तेजस्वी यादव व राहुल गांधी एकत्र आले, पण निवडणूक आयोगाने निकाल आधीच ठरवून टाकला. त्यामुळे झाले काय, तर जनतेचा निवडणुकांवरील विश्वास पूर्णपणे उडाला आहे. अशा निवडणुकांचा फायदा काय? अशाने उद्या विरोधी पक्षांना उमेदवार मिळणे कठीण होईल व निवडणुका एकतर्फी होतील. निवडणुका जिंकण्याची क्षमता असलेल्या कोणालाही भाजपमध्ये प्रवेश व पद दिले जाते. हिंदुत्वाची लाट नाही, मोदींचे वारे नाही. तरीही भाजप विजयी होतो. लोकांचे प्रश्न तसेच आहेत व केंद्र सरकार थापा मारत आहे. तरीही लोकांनी मोदींना मतदान का करावे? हा प्रश्न कायम आहे. काँग्रेस उताराला लागली आहे व प्रादेशिक पक्षांचे पूर्ण खच्चीकरण सुरूच आहे

निवडणुका होत राहतील. भाजप जिंकत जाईल. विरोधकांनी आता काय करायचे?

लोकशाही वाचवण्यासाठी निवडणुकांवर बहिष्कार हाच एकमेव मार्ग दिसतो.

ट्विटर – @rautsanjay61

Gmail- [email protected]

Comments are closed.