पक्ष सोडताच पहिला हल्ला आदित्य ठाकरेंवर, वरळीतून निवडणूक लढणार का? सचिन अहिर स्पष्टच म्हणाले..
सचिन अहिर मुंबईत पत्रकार परिषद. आपल्यासोबत असेपर्यंत चांगले आणि पक्ष सोडल्यावर नालायक ठरवण्याचा प्रयत्न हा दुर्देवी आहे. जेव्हा इतर पक्षातून आपल्याकडे लोक येतात तेव्हा ते स्वार्थाचा विचार करत नाहीत. हेच नेते जातात तेव्हा मात्र त्यांना स्वार्थी ठरवले जाते. काहींना वाटतं की, आपणच सर्वकाही आहोत. पण मतदारसंघातील लोकांना माझं योगदान माहिती आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे फुटीर आमदार सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी त्यांच्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर सचिन अहिर आणि एकनाथ शिंदे (मराठी) यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी सचिन अहिर यांनी राजकीय आरोपांना थेट उत्तर देणे टाळले असले तरी त्यांनी मोजक्या शब्दांमध्ये आदित्य ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे पलटवार केला. (Maharashtra Politics news)
मी माझ्यावर करण्यात येणाऱ्या आरोपांना योग्यवेळी राजकीय व्यासपीठावरुन उत्तर देईन. उद्धवजी आणि आदित्यजी यांनी माझ्यावर विधिमंडळात जी जी जबाबदारी सोपवली ती शेवटपर्यंत पार पाडण्याचं काम मी केले. विधानसभा आणि महानगरपालिकेत (Mahanagarpalika) माझं काय योगदान आहे, हे त्या त्या भागातील लोकांना माहिती आहे. तेथील कार्यकर्त्यांनाही याबाबत विचारल्यास ते सांगतील. पण काहींना वाटतं आम्हीच आहोत, असे सचिन अहिर यांनी म्हटले. यावेळी पत्रकारांनी सचिन अहिर यांना तुम्ही 2029 मध्ये वरळीतून विधानसभेची (Worli Vidhansabha Election) निवडणूक लढणार का, असा प्रश्न विचारला. यावर सचिन अहिर यांनी अत्यंत सूचक असे उत्तर दिले. मी एकनाथ शिंदे माझ्यावर जी जी जबाबदारी देतील, ती ताकदीने पार पाडेन, असे सचिन अहिर यांनी सांगितले.
मी एकनाथ शिंदे यांचा मनापासून आभारी आहे. शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला उपसभापती पदाची संधी देऊन तळागाळातील कार्यकर्ता या पदावर जाऊ शकतो, ही प्रेरणा दिली. मी आता शिवसेनेत आल्यानंतर ग्रामीण भागात पक्षसंघटना कशी वाढेल, हा मानस घेऊन शिंदे साहेबांसोबत काम करणार आहे, असे सचिन अहिर यांनी सांगितले. मी आता राजकीय आरोपांवर बोलणार नाही. त्यासाठी वेगळे व्यासपीठ आहे. आताच माझ्यावर लोकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. त्याला मी राजकीय व्यासपीठावरुन उत्तर देईन, असेही त्यांनी म्हटले.
Aaditya Thackeray : आता, तुमच्या आरत्याच करायच्या का? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
गेले चार दिवस आणि त्याआधीचे 4 वर्ष आम्ही पाहातोय जे जवळचे लोक आहेत ज्यांना सगळं काही मिळतंय, तेचस्वत:च्या स्वार्थासाठी निघून जाताय. त्यामुळे यात काही आश्चर्य नाही. धक्का बसण्यासारखं नाही. वरळी असेल किंवा शिवडी असेल हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. कोणी येण्याने किंवा जाण्याने धक्का बसत नाही. आदित्य ठाकरेंशी ते बोलूच नाही शकत असं नाही. प्रभाग समिती असेल. बेस्ट, शिवसेनेत उपनेत्या पद आहे, युनियन अध्यक्षपद असेल. रोज येणं जाणं आणि संवाद होता. मग प्रश्न पडतो कि अजून तुम्हाला काय पाहिजे? बाकी लोक ओरडतात तसं भेटत नव्हतो का? तर असं पण नाहीये, सोबतच असायचो, मग अजून किती ओरबडणार आणि आम्ही अजून काय करायला हवं? आता रोज काय तुमच्या आरत्याच करायच्या का? असा संतप्त सवाल करत आदित्य ठाकरे यांनी सचिन अहिर यांना लक्ष्य केले होते.
आणखी वाचा
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
Comments are closed.